शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Gujarat Election 2022: आश्वासनांची खैरात! काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यात ५०० रुपयांत सिलिंडर, आता भाजप आणि आपकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 08:56 IST

Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. सरकारी आणि निमसरकारी विभागांत दहा लाख नोकऱ्या, ५०० रुपयांत एलपीजी सिलिंडर, दरमहा ३०० युनिट मोफत वीज, बेरोजगारांना दरमहा ३,००० रुपये भत्ता, तसेच दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक व गरजू महिलांना २,००० रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन दिले आहे. 

दोन दशकांहून अधिक काळ राज्यात सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने दिली आहेत. मच्छीमारांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, केजी ते पीजी (बालवाडी ते पदव्युत्तर) मोफत शिक्षण देण्याचेही आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. गेहलोत हे गुजरात निवडणुकीसाठी पक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आहेत. सत्ताधारी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध हाेण्यास पाच ते सहा दिवस लागू शकतात.

भाजपच्या दुसऱ्या यादीत माजी मंत्र्यांचे तिकीट कापलेभाजपने गुजरातमध्ये आणखी सहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. माजी मंत्री विभावरीबेन दवे यांच्याऐवजी सेजल पांड्या यांना उमेदवारी दिली आहे. धोराजी येथून माजी कुलगुरू महेंद्र पडालिया यांना तिकीट दिले आहे. 

नरोडा पाटिया प्रकरणातील दोषीच्या मुलीला उमेदवारीभाजपने २००२ च्या गोध्रा प्रकरणानंतरच्या नरोडा पाटिया दंगलीतील दोषी मनोज कुक्राणीची मुलगी पायल कुक्राणी (वय ३०) यांना अहमदाबादच्या नरोडा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022