शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

"मोदी-मोदी असा 1008 वेळा जप करतो, तुम्हीही करावा", गृहमंत्र्यांचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:00 IST

gujarat election 2022 : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचेही हर्ष सांघवी म्हणाले.

साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या 2022 च्या (Gujarat Election 2022)  पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज ८९ जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी 788 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होत आहे. दरम्यान, गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी (Harsh Sanghavi) म्हणाले की, "मी 1008 वेळा मोदी-मोदी असा जप करतो आणि मी सर्वांना सांगतो की, प्रत्येकाने मोदी-मोदी जप करावा." याचबरोबर, गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचेही हर्ष सांघवी म्हणाले.

दुसरीकडे, असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) मंगळवारी गुजरात निवडणुकीशी संबंधित काही आकडेवारी सादर केली आहे. या आकडेवारीनुसार, गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 721 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या निवडणुकीत सर्व पक्षांनी रिंगणात उतरवलेल्या 125 आमदारांपैकी मालमत्ता वाढीच्या बाबतीत अव्वल पाच आमदार भाजपचे  (BJP) असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष सांघवी आणि त्यांच्या पत्नीची मालमत्ता 2017 मध्ये 2.12 कोटी रुपये होती. ती आता 2022 मध्ये 17.42 कोटी रुपये झाली आहे, असे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) रिपोर्टद्वारे समोर आले आहे. तसेच, हिरे व्यापारी हर्ष सांघवी पुन्हा एकदा सूरतच्या माजुराच्या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. रिपोर्टनुसार, सांघवीच्या तुलनेत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची संपत्ती 2017 मध्ये 5.19 कोटी रुपयांवरून 2022 मध्ये 58 टक्क्यांनी वाढून 8.22 कोटी रुपये झाली आहे.

दरम्यान, गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 2.39 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 1,24,33,362 पुरूष तर 1,15,42,811 महिला मतदार आहेत. याशिवाय पहिल्या टप्प्यात  497 तृतीयपंथी मतदारही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याचबरोबर, निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी एकूण 25434 मतदान केंद्रे केली आहेत. त्यामुळे मतदारांना कोणताही त्रास होणार नाही. त्यापैकी 9018 शहरी मतदान केंद्रे असून 16416 ग्रामीण मतदान केंद्रे आहेत.

182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणारगुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला विधानसभेच्या 89 जागांवर मतदान होत आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला 93 जागांसाठी मतदान होणार आहे. 8 डिसेंबरला निकाल लागणार आहे. यानंतर गुजरातमध्ये पुन्हा कोण सत्तेवर बसणार, हे स्पष्ट होईल. भाजप, काँग्रेस आणि आप हे तिन्ही पक्ष जोरदार निवडणूक लढवत आहेत. यंदाच्या निवडणुकीत आप जोरदारपणे निवडणूक लढवत असल्याने ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात