शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

Shraddha Murder Case: “…तर प्रत्येक शहरात आफताब जन्माला येईल”; गुजरात निवडणुकीत श्रद्धा हत्याकांडाचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 15:40 IST

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा हत्याकांडामुळे देशभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता गुजरात निवडणूक प्रचारातही उमटताना दिसत आहेत.

Shraddha Walkar Murder Case:श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटताना दिसत असून, गुजरात निवडणूक प्रचारातही (Gujarat Election 2022) हा मुद्दा येताना दिसत आहे. भाजपचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (CM Himanta Sarma) यांनी श्रद्धा हत्याकांडाचे प्रकरण लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा दावा केला आहे. 

आपल्या देशामध्ये सक्षम नेतृत्व नसेल, देशाची आईप्रमाणे काळजी घेणारे सरकार नसेल तर असे आफताब प्रत्येक शहरामध्ये तयार होतील. तसेच असे झाले तर आपण आपल्या समाजाची सुरक्षा करु शकणार नाही, अशी शक्यता मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी म्हटले आहे.  आफताबने श्रद्धाला मुंबईवरुन घेऊन आला आणि लव्ह-जिहादच्या नावाखाली ३५ तुकडे केले तिच्या मृतदेहाचे. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. मृतदेह फ्रिजमध्ये होता त्याचवेळेस तो दुसऱ्या मुलीला घेऊन आला आणि डेटींग करु लागला, असे शर्मा यांनी या प्रकरणासंदर्भात म्हटले आहे.

आपण आपल्या समाजाची रक्षाही करु शकणार नाही

देशाकडे एक शक्तिशाली नेतृत्व, नेता नसेल, देशाला आई मानणारे सरकार नसेल तर प्रत्येक शहरामध्ये असा आफताब जन्माला येईल. आपण आपल्या समाजाची रक्षाही करु शकणार नाही, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, श्रद्धा हत्याकांडात आता अनेक कंगोरे पुढे येत आहेत. रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासादरम्यान आफताबची चौकशी केल्यानंतर आता आफताब हा सीरियल किलर असण्याची शक्यताही पोलिसांना आहे.

दरम्यान, आफताबच्या संपर्कात आलेल्या इतर मुलींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. त्याच्या डिजिटल फूटप्रिंटच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. आफताब डेटिंग एपच्या माध्यमातून मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा, त्यामुळे पोलीस त्याची हिस्ट्री चेक करण्यात व्यस्त आहेत. आफताबच्या जबाबात सततच्या विसंगतीमुळे आफताब अजूनही काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022