शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

BSF कॉन्स्टेबलच्या मुलानं रचला इतिहास, आता घेणार 'एवढ्या' पगाराचं पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 15:47 IST

अविनाश कंबोज असं या मुलाचं नाव असून अविनाशने कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंटमध्ये इतिहास रचला आहे.

ठळक मुद्दे अविनाश कंबोज असं या मुलाचं नाव असून अविनाशने कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंटमध्ये इतिहास रचला आहे. अविनाशचे वडील कुलजीत कंबोज हे बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल आहेत. अविनाशला एकूण 50.31 लाखांचे पॅकेजची ऑफर देण्यात आली असून हे पॅकेज सर्वात जास्त आहे.

अहमदाबाद - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ)मध्ये तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलच्या मुलाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. अविनाश कंबोज असं या मुलाचं नाव असून अविनाशने कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंटमध्ये इतिहास रचला आहे. गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आनंदमध्ये शिक्षण घेत असलेल्या अविनाशला 50 लाख वार्षिक पगाराचे पॅकेज मिळाले आहे.

अविनाश कंबोज हा हरयाणातील सिरसा जिल्ह्याचा रहिवासी आहे. अविनाशचे वडील कुलजीत कंबोज हे बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल आहेत. अविनाशला एकूण 50.31 लाखांचे पॅकेजची ऑफर देण्यात आली असून हे पॅकेज सर्वात जास्त आहे. गेल्या वर्षी त्याच्या कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला 46.50 लाखांचे पॅकेज देण्यात आले होते. त्यानंतर सर्वाधिक पॅकेज मिळवणारा अविनाश हा एकमेव विद्यार्थी ठरला आहे. 

अविनाशने सिरसा जिल्ह्यातील सालरपूर गावात प्राथमिक शिक्षण घेतले आहे. त्यानंतर चौधरी चरण सिंग हरयाणा अग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमधून शेती या विषयात बीएससीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 'मी आता फ्रेशर आहे आणि ही माझी पहिलीच नोकरी आहे. तीन-चार वर्ष मला इंडस्ट्रीमध्ये अनुभव घ्यायचा आहे,' अशी माहिती प्लेसमेंटबाबत विचारले असता अविनाशने दिले. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलHaryanaहरयाणाjobनोकरी