शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसला झटका; काही आमदार संपर्काच्या बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 15:04 IST

काँग्रेस 7 आमदारांशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुजरातमध्ये सावध पावलं उचलण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देगुजरातमधल्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. आमदार जे. वी. काकडिया आणि सोमाभाई पटेल हे आमदार काँग्रेसच्या संपर्कात नाहीत. खरं तर ते आमदार भाजपाला समर्थन देणार असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचा आणखी एक आमदार मंगल गावित यांच्याशीही संपर्क साधू शकलेले नाही.

नवी दिल्लीः गुजरातमधल्याराज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. आमदार जे. वी. काकडिया आणि सोमाभाई पटेल हे आमदार काँग्रेसच्या संपर्कात नाहीत. खरं तर ते आमदार भाजपाला समर्थन देणार असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचा आणखी एक आमदार मंगल गावित यांच्याशीही संपर्क साधू शकलेले नाही. ते आमदार राजीनामेसुद्धा देऊ शकतात, अशीही अटकळ बांधली जात आहे. काँग्रेसकडे 73 आमदार आहे. काँग्रेस 7 आमदारांशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुजरातमध्ये सावध पावलं उचलण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. शनिवारी काँग्रेसनं आपले 14 आमदार जयपूरमध्ये हलवले होते. गुजरातमधले हे आमदार जयपूरच्या पाच सितारा हॉटेल शिव विलासमध्ये थांबले आहेत. या सर्व आमदारांना राजस्थान सरकारमधले महेश जोशी आणि महेंद्र चौधरी बस घेऊन शिव विलास हॉटेलमध्ये घेऊन गेले. गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या आणखी तीन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अभय भारद्वाज आणि रमिला बेन बाराबरोबर तिसऱ्या उमेदवाराच्या स्वरूपात नरहरी अमीननं नामांकन अर्ज दाखल केलं आहे. काँग्रेसकडून शक्ती सिंह गोहिल आणि भरत सिंह सोलंकी यांनी नामांकन अर्ज भरलं आहे. भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही आपापल्या विजयाचा दावा केला आहे. मध्य प्रदेशातील राजकीय उलथापलाथीनंतर या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांकडून भाजपाच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे सावधगिरी म्हणून काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरला हलवले आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे आमदार हिंमत सिंह पटेल यांनी, 'आमच्या पक्षात सर्वकाही ठीक आहे. प्रत्येक पक्षाची रणनीती असते. त्यामुळे हा एक रणनीतीचा भाग आहे, असे म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असतानाही काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरमधेच ठेवले होते. गुजरातमधील चार राज्‍यसभा जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने अभय भारद्वाज, रमीराबेल बारा आणि नरहरी अमीन यांना रिंगणात उतरवले आहे. अमीन यांनी २०१२ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांकडून त्यांना क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाGujaratगुजरातcongressकाँग्रेस