शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

“BJP कार्यकर्त्याला नोकरीची चिंता नको, आरामात मिळेल”; गुजरातमधील नेत्याचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 09:01 IST

गुजरातमध्ये सरकारी नोकरीसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

अहमदाबाद: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध पक्षातील नेत्यांच्या अनेक खळबळजनक आणि वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघत आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपांना पूर आल्याचे चित्र आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये सरकारीनोकरीसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातच गुजरातमधील भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी मोठे विधान केले असून, भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या मुलांनी नोकरीची अजिबात चिंता करू नये, ती त्यांना आरामात मिळेल. भाजपचेच सरकार असल्यामुळे कार्यकर्त्यांना मागे ठेवणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे. 

गुजरातमधील साबरकांठा येथील हिम्मतनगर येथे बोलताना सीआर पाटील यांनी सदर विधान केले आहे. भाजप कार्यकर्त्याला सहजपणे नोकरी मिळू शकेल. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, तो भाजपचा कार्यकर्ता असायला हवा, हे निश्चित, असे पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

भाजपचेच सरकार आहे, कार्यकर्ता मागे राहणार नाही

आमच्या एका जिल्हा प्रभारींनी एका व्यक्ती कडाक्याच्या थंडीतून जाताना दिसली. त्यांनी हटकून विचारले असता पेज कमिटीचा तपशील देण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर जिल्हा प्रभारी त्यांना माझ्याकडे घेऊन आले. ती व्यक्ती म्हणाली की, गेल्या २० वर्षांपासून मी भाजपसाठी काम करतोय. एक गोष्ट विचारायची होती. पण ती सांगावी का याबाबत द्विधा मनःस्थिती आहे. कशी विचारावी याबाबत संकोच वाटतोय, यावर त्या व्यक्तीला मोकळेपणाने बोलायला सांगितल्यावर तो कार्यकर्ता म्हणाला की, माझ्या मुलाला नोकरी मिळत नाही. अनेक ठिकाणी प्रयत्न करून झाले. मात्र, या भेटीनंतर त्याच्या मुलाला नोकरी लागली. भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला पाठी ठेवणार नाही. कार्यकर्त्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले. 

काँग्रेसचे टीकास्त्र

सीआर पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. केवळ भाजपचा कार्यकर्ता आहे, या निकषावर नोकऱ्या देणे चुकीचे आहे. नोकरी देताना क्वालिफिकेशन, क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे. अशाने नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या योग्य उमेदवारांवर अन्याय होतो, असे काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या मुलांच्या नोकरीसाठी सीआर पाटील यांना फोन करावा, असा खोचक सल्लाही दिला.  

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाjobनोकरी