शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातची शान वाढली; सिंह, बिबट्यासोबत घुमली वाघोबाची डरकाळी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 12:20 IST

30 वर्षांनंतर प्रथमच गुजरातमध्ये दिसला वाघ

अहमदाबाद: गुजरातच्या महिसागर जिल्ह्यात वाघाचं दर्शन घडलं आहे. 1989 पासून गुजरातमध्येवाघ दिसला नव्हता. त्यामुळे गुजरातमधील प्राणीप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. हा वाघ नेमका गुजरातमधलाच आहे की तो शेजारच्या राज्यातून आला आहे, याचा शोध सध्या सुरू आहे. हा वाघ गुजरातचाच असल्याचं सिद्ध झाल्यास, सिंह, बिबट्या आणि वाघ यांचं वास्तव्य असलेलं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य ठरेल. याबद्दलचा तपास सध्या सुरू असला तरी, राज्यात आनंदाची लाट उसळली आहे.गुजरातमधले सिंह जगप्रसिद्ध आहेत. देशाच्या इतर भागांमध्ये बिबट्या आणि वाघ पाहायला मिळतात. मात्र सिंहांचं दर्शन केवळ गुजरातमध्येच घडतं. गिर अभयारण्यात आशियाई सिंह पाहायला मिळतात. याशिवाय गुजरातमध्ये बिबट्यादेखील पाहायला मिळतो. मात्र गेल्या 30 वर्षांपासून राज्यात वाघ दिसला नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वीच महिसागर जिल्ह्यात एका शिक्षकाला वाघ दिसला. त्यामुळे राज्यातील वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला.'महिसागर जिल्ह्यात एका व्यक्तीला वाघ दिसला आहे. त्यामुळे वाघ, सिंह आणि बिबट्या यांचं वास्तव्य असलेलं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य ठरेल,' असं मुख्य वन्य संवर्धक (वन्यजीवन) ए. के. सक्सेना म्हणाले. सध्या वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. हा वाघ मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्रातून आला की गुजरातमध्येच त्याचं वास्तव्य आहे, याचा शोध सध्या घेतला जात असल्याची माहिती सक्सेना यांनी दिली. गुजरातमध्ये वाघाचं वास्तव्य आहे, ही बाब आनंददायक असल्याचं राज्याचे वनमंत्री गणपत वसावा म्हणाले. राज्यात व्याघ्र संवर्धनासाठी कॉरिडॉर विकसित केला जाऊ शकतो. यासाठी राज्याच्या वन विभागानं केंद्रातील तज्ज्ञांची मदत मागितल्याचंही त्यांनी सांगितलं. याप्रकरणी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रशासनाला सतर्क राहण्याची सूचना करण्याती आल्याची माहितीदेखील वसावा यांनी दिली. गुजरातमधील सिंहांनी इतर राज्यांमध्ये हलवण्याचा प्रयत्न अनेकदा करण्यात आला. देशाच्या इतर भागांमध्येही सिंहांची संख्या वाढवावी, या हेतूनं हे प्रयत्न केले गेले. मात्र त्यात फारसं यश आलेलं नाही. त्यामुळे आशियाई सिंह केवळ गुजरातमध्येच आढळून येतात. देशातल्या इतर कुठल्याच राज्यात वाघ, सिंह आणि बिबट्या दिसत नाहीत, त्यामागे हेच कारण आहे.  

टॅग्स :TigerवाघGujaratगुजरातleopardबिबट्या