शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

गुजरात विधानसभा निवडणूक : आयाराम-गयारामांना महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:24 IST

आपल्याच पक्षातील असंतुष्टांमुळे त्रस्त असलेल्या भाजप आणि काँग्रेसने संधी मिळेल तेव्हा एकमेकांच्या बंडखोरांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच गुजरात निवडणुकीत यंदा आयाराम-गयारामांना महत्त्व आले.

- महेश खरेसुरत : आपल्याच पक्षातील असंतुष्टांमुळे त्रस्त असलेल्या भाजप आणि काँग्रेसने संधी मिळेल तेव्हा एकमेकांच्या बंडखोरांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच गुजरात निवडणुकीत यंदा आयाराम-गयारामांना महत्त्व आले. आपल्या पक्षाकडून तिकीट मिळाले नाही म्हणून काही असंतुष्टांनी दुस-या पक्षांकडून तिकीट मिळविल्याचे दिसते. काही नेत्यांनी आपल्या पक्षाकडे तिकीट तर मागितलेच, पण दुस-या पक्षाच्या नेत्यांशी संपर्क ठेवला. जेव्हा आपल्या पक्षाने तिकीट नाकारले तेव्हा हे नेते दुस-या पक्षाचे तिकीट घेऊन मैदानात उतरले.भाजपने दिले तिकीटकाँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर अनेक नेत्यांनी भाजपला जवळ केले. काँग्रेसच्या दहापेक्षा अधिक नेत्यांना भाजपने तिकीट दिले आहे. राज्यसभा निवडणुकीत तर काँग्रेसने आपल्या आमदारांना गुजरातहून कर्नाटकात नेले होते. त्यावेळी पक्ष बदलून आलेल्या सर्व आमदारांना भाजपने आपल्या यादीत स्थान दिले. काल जे काँग्रेससाठी समर्थन मागत होते ते आज स्वत: आणि भाजपसाठी मते मागताना दिसत आहेत. राष्ट्रवादीनेही दुसºया पक्षातील तिकिटापासून वंचित नेत्यांना स्वीकारण्यास वेळ लावला नाही. राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवारांत सावलीतून खुमान सिंह चौहान, बनासकांठामधून बहादूर भाई, चालसा येथून दिनेश ठाकोर, मोखामधून भूपत सिंह, थरा येथून मावजी भाई, रापरमधून बाबू मेघजी शाह यांचा समावेश आहे.

भाजप सोडून झाले अपक्ष उमेदवारभाजपच्या तिकिटापासून वंचित राहिलेले काही नेते अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. यात लालजी मेर, कमा राठोड, धर्मेंद्र सिंह वाघेला (वाघोडिया), जसवंत सिंह परमार, चेतन पटेल, खुमान सिंह, सुनील पटेल यांचा समावेश आहे. सुरतच्या लिंबायत भागातून डॉ. रवींद्र पाटील यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर ते काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत. भाजपच्या उमेदवार संगीता पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याच्या निर्णयाबाबत ते ठाम राहिले.असंतुष्ट ठरले अडथळागुजरात विधानसभा निवडणुकीत असंतुष्ट उमेदवार क ाँग्रेस आणि भाजपच्या अधिकृत उमेदवारांसाठी समस्या बनले आहेत. चौर्यासी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अजय चौधरी भाजपचे महामंत्री राहिलेले आहेत. पण, पक्षाने त्यांना संधी न दिल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. दक्षिण आणि उत्तर गुजरातमध्ये असंतुष्टांची संख्या मोठी आहे.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017