शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Assembly Election 2022: गुजरातच्या 'मतसंग्रामा'चा शंखनाद, दोन टप्प्यांत मतदान; निकालाचा दिवसही ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 12:38 IST

Gujarat Assembly elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून राज्यातील १८२ मतदार संघांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

Gujarat Assembly elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून राज्यातील १८२ मतदार संघांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचीही मतमोजणी जाहीर होणार आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये यंदा ३ लाख २४ हजार नवे मतदार आहेत. तसंच राज्यात एकूण ५१,७८२ मतदान केंद्र सज्ज असणार आहेत. यासाठी कडेकोड सुरक्षा व्यवस्था देखील असणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर सर्व सुविधा असतील. पिण्याचं पाणी, वेटिंग रुम, टॉयलेट, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सुविधा यांचा समावेश असणार आहे. तसंच राज्यातील ५० टक्के मतदान केंद्रांवर मतदानाचं लाइव्ह टेलिकास्ट देखील होणार आहे. 

निवडणूक आयोगाकडून यावेळी सोशल मीडिया टीम देखील नियुक्त करण्यात येणार आहेत. ज्या फेक न्यूजवर लक्ष ठेवणार आहेत. फेक न्यूजचा प्रसार करणाऱ्यांवर तातडीनं जी काही कठोर कारवाई असेल ती केली जाणार असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं. तसंच फेक न्यूज फॉरवर्ड करू नका आवाहन देखील यावेळी राजीव कुमार यांनी मतदारांना केलं आहे.

असा आहे गुजरातचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम-

पहिला टप्पा-निवडणुकीसाठीचे नोटिफिकेशन- ५ नोव्हेंबर २०२२अर्ज दाखल करण्याची मुदत- १४ नोव्हेंबर २०२२अर्ज छाननी प्रक्रिया- १५ नोव्हेंबर २०२२उमेदवारी माघार घेण्याची मुदत-  १७ नोव्हेंबर २०२२मतदानाची तारीख- १ डिसेंबर २०२२

दुसरा टप्पानिवडणुकीसाठीचे नोटिफिकेशन- १० नोव्हेंबर २०२२अर्ज दाखल करण्याची मुदत- १७ नोव्हेंबर २०२२अर्ज छाननी प्रक्रिया- १८ नोव्हेंबर २०२२उमेदवारी माघार घेण्याची मुदत- २१ नोव्हेंबर २०२२मतदानाची तारीख- ५ डिसेंबर २०२२

मतमोजणी- ८ डिसेंबर २०२२

टॅग्स :GujaratगुजरातElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग