शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात विधानसभा : भाजपाचे 70 उमेदवार जाहीर, मुख्यमंत्री रुपानी राजकोटमधून लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:22 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत काँग्रेसमधील पाच बंडखोर व ४० विद्यमान आमदार आहेत.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत काँग्रेसमधील पाच बंडखोर व ४० विद्यमान आमदार आहेत. या यादीत भाजपने १६ नव्या चेह-यांनाही संधी दिली आहे.१८२ सदस्यांच्या विधानसभेसाठी ९ व १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राघवजी पटेल, धर्मेंद्रसिंह जाडेजा, रामसिंह परमार, मानसिंह चौहान आणि सी. के. रावोलजी यांचा बंडखोरांत समावेश आहे. या पाचही जणांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत, तसेच राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अहमद पटेल उभे असताना भाजपला पाठिंबा दिला होता. राजकोट (पश्चिम) मतदारसंघातून मुख्यमंत्री विजय रुपानी यांना उमेदवारी दिली गेली आहे. उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे मेहसाना व गुजरात प्रदेश भाजपचे अध्यक्ष जितूभाई वाघानी हे भावनगर मतदारसंघातून उमेदवार आहेत.१७ पटेल, १८ ओबीसी...७० उमेदवारांत १७ पटेल, १८ इतर मागासवर्गीय (ओबीसी), तीन अनुसूचित जाती व ११ अनुसूचित जमातींचे उमेदवार आहेत. ओबीसी उमेदवारांतील बहुसंख्य हे ठाकोर असून, त्यानंतर कोळी समाजाचे आहेत, असे सूत्रांनी सांगितले. नावांची यादी भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक समितीने बुधवारच्या बैठकीत अंतिम केली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा होते व पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व इतर नेते उपस्थित होते.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपा