शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Aam Aadmi Party : 2 दिवसांत आपचा 'डबल धमाका'; गुजरात हिमाचलमध्ये पराभव होऊनही ठरली 'बाजीगर'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 11:58 IST

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला चांगली कामगिरी करता आली नसली, तरी...

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने राजधानी दिल्लीतील महापालिका निवडणुकीत मोठ्या विजय मिळविल्यानंतर, आता दुसऱ्याच दिवशी आणखी एक विक्रम केला आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला चांगली कामगिरी करता आली नसली, तरीही त्यांच्या पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. याच बरोबर देशातील राष्ट्रीय पक्षांचा आकडा वाढून आता 9 वर पोहोचेल.

गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने आतापर्यंत जवळपास 13 टक्के मते मिळविली आहेत. याच बरोबर आता आप गुजरातमध्ये एक प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षही बनला आहे. मात्र, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून याची अधिकृत घोषणा केली जाईल.

देशात एकूण किती राष्ट्रीय पक्ष -निवडणूक आयोगानुसार देशात, काँग्रेस, भाजप, बीएसपी, तृणमूल काँग्रेस, एनसीपी, सीपीआय, सीपीआयएम आणि एनपीपी हे आधीपासूनच राष्ट्रीय पक्ष आहेत. एनपीपीला 2019 मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आपला दिल्ली, पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये आधीच राज्य स्थरीय अथवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आपला गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत 6.8 टक्के मते मिळाली आहेत.

राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी महत्वाच्या अटी - कुठल्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागत असतात. 1. जर एखाद्या पक्षाने चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा मिळवला तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.2. जर एखाद्या पक्षाने तीन राज्य मिळून लोकसभेत तीन टक्के जागा मिळवल्या तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.3. जर एखाद्या पक्षाने चार लोकसभा जागांशिवाय संसदीय अथवा विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये 6 टक्के मते मिळविली तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.4. जर एखाद्या पक्षाने वरील पैकी कुठल्याही तीन अटींपैकी एक अट पूर्ण केल्यास, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीPoliticsराजकारणElectionनिवडणूक