अहमदाबादच्या नोबल नगर परिसरातील एका भयानक घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शिव बंगला परिसरात खेळत असलेल्या एका ३ वर्षांच्या मुलीच्या अंगावरून कार गेली. पण त्यानंतर कार थांबताच चिमुकली बाहेर पडली आणि धावू लागली. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, जी आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
स्थानिकांनी घटनेनंतर मुलीला ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तिला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी अल्पवयीन चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे. प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, कार अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाची होती आणि तो लायसन्स नसतानाही कार चालवत होता. पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हिडीओमध्ये रस्त्यावर खेळणाऱ्या ३ वर्षांच्या मुलीला एका भरधाव कारने धडक दिली. कार मुलीच्या अंगावरून गेली तरी मुलीचा जीव वाचला. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटलं आहे. सोशल मीडियावर लोक याला "देवी चमत्कार" म्हणत आहेत, तर काहीजण पालकांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
या घटनेनंतर, स्थानिक रहिवाशांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. लोकांचं म्हणणं आहे की, अल्पवयीन मुलाला कार चालवायला देणं हे केवळ कायद्याचं उल्लंघनच नाही तर मुलांसाठी आणि समाजासाठी धोकादायक आहे. या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
Web Summary : In Ahmedabad, a 3-year-old girl miraculously survived after being run over by a car driven by a minor. CCTV footage shows the girl getting up and running after the incident. She sustained minor injuries and the minor driver is in police custody.
Web Summary : अहमदाबाद में एक नाबालिग द्वारा चलाई जा रही कार से कुचलने के बाद एक 3 वर्षीय बच्ची चमत्कारिक ढंग से बच गई। सीसीटीवी फुटेज में बच्ची घटना के बाद उठकर भागती हुई दिख रही है। उसे मामूली चोटें आईं हैं और नाबालिग ड्राइवर पुलिस हिरासत में है।