शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:06 IST

अहमदाबाद विमान अपघातानंतर, सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या पोस्टमध्ये एका ज्योतिषीने ७ जूननंतर मोठा विमान अपघात होण्याची शक्यता वर्तवली होती.

 गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात केवळ एक प्रवासी बचावला. हे विमान गुरुवारी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघाले होते. मात्र उड्डाणानंतर अवघ्या ३० सेकंदातच ते कोसळले. एअर इंडियाने २४१ नागरिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या पोस्टमध्ये एका ज्योतिषीने ७ जूननंतर मोठा विमान अपघात होण्याची शक्यता वर्तवली होती. याच बरोबर त्यांनी एका मोठ्या नेत्याच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती.

ज्योतिषी गौरव पुरोहित यांनी ३१ मे २०२५ रोजी लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टमध्ये  म्हटले होते. '७ जूननंतर भारतासह अनेक देशांमध्ये विमान अपघात होतील. अशा अनेक घटना अनेक देशांमध्ये घडतील. भारत, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनमधील मोठ्या आणि प्रसिद्ध लोकांचाही विमान अपघातात मृत्यू होऊ शकतो. सर्वसाधारणपणे, याचा पूर्ण योग बनत आहे." त्यांनी एका मोठ्या लष्करी अधिकाऱ्याच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली आहे.

गौरव पुरोहित लाइव हिन्दुस्तानसोबत बोलताना म्हणाले, "आपण गेल्या पाच वर्षांपासून अशा पद्धतीची भाकितं करत आहोत. आपण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थव्यवस्था, क्रीडा, लष्कर यांसारख्या विषयांवर भाकितं करत असतो. याचवेळी, आपली ९९ टक्के भाकितं खरी ठरली आहेत. यात, उत्तर प्रदेश निवडणुका, राजस्थान निवडणुका आणि आयपीएलमधील संघांच्या कामगिरीसंदर्भातील भाकितं अचूक ठरली आहेत, असा दावाही त्यांनी केला. 

गौरव पुरोहित हे मुळचे राजस्थानची राजधानी जयपूर येथील रहिवासी आहेत. ते ज्योतिषशास्त्रीय गणनेच्या आधारावर भविष्यवाणी करत असतात. त्यांनी ज्योतिष विषयात बीए, बीएड आणि एमएपर्यंत शिक्षण घेतले आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातDeathमृत्यूAstrologyफलज्योतिष