शहरं
Join us  
Trending Stories
1
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
2
नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश; छत्तीसगड-मध्य प्रदेशातील कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
3
इंडिगोची कार्यसंस्कृती अशी आहे...? माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम'
4
काश्मीरमध्ये विनापरवाना फिरताना सापडला चिनी नागरिक, फोनमधून समोर आली धक्कादायक माहिती
5
दुभाजक ओलांडताना धडक, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचा अपघाती मृत्यू; पतीसह चालक गंभीर जखमी
6
Psycho Killer Poonam : "माझ्या मुलीसारखं पूनमलाही तडफडून-तडफडून मारा"; जियाच्या आईचा सायको किलरबद्दल मोठा खुलासा
7
ऑनलाईन गेम खेळताना गमावले ६३ हजार; २६ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, म्हणाली...
8
विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद?
9
Haridwar: बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या शौर्य यात्रेवर दगडफेक, कार्यकर्त्यांचा रस्त्यावर गोंधळ!
10
'इंडिगो'वर 'अशी' वेळ का आली? पायलट्सनीच सांगितलं खरं कारण; FDTL नियम मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर?
11
२४ रुपयांच्या वांग्यांच्या नादात लागला ₹८७,००० चा चुना, एका चुकीच्या कॉलनं 'गेम'च झाला
12
Russia Ukraine War: 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला
13
पोलीस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; खोलीतून किंचाळत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक
14
मुलींना येतात 'दाढी-मिशा'; फक्त हार्मोन्समुळे नाही तर 'ही' आहेत कारण, WHO चे डॉक्टर म्हणतात...
15
'या' स्टार क्रिकेटपटूचा टेस्ट आणि टी-२० मधून निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय, चाहते झाले खूश!
16
आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी
17
पाकिस्तानच्या तुरुंगातील महिलेवर फिदा झाला अन् थेट सीमा पार करायला निघाला भारताचा बीटेक ग्रॅजुएट!
18
Aadhaar News: आधार फोटोकॉपीवर बंदी... लवकरच येणार कडक नियम, नक्की काय आहे सरकारचा प्लॅन?
19
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलची पहिली पोस्ट, शेअर केला 'तो' व्हिडीओ म्हणाला- "माझ्या वडिलांचा..."
20
मूल होऊ न देण्याच्या निर्णयावर आजही ठाम, गीतांजली कुलकर्णींनी सांगितलं कारण; तर पर्ण म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातेत 140 इंजिनियर इव्हीएम हॅक करण्याच्या तयारीत! हार्दिक पटेलचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 10:18 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला एकापाठोपाठ एक आरोप करून हैराण करणाऱ्या हार्दिक पटेलने आता इव्हीएमवरून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला एकापाठोपाठ एक आरोप करून हैराण करणाऱ्या हार्दिक पटेलने आता इव्हीएमवरून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी जाहीर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापूर्वी हार्दिक पटेलने इव्हीएमवर प्रश्नचिन्ह लावले आहे. अहमदाबादमधील एका कंपनीचे 140 इंजिनियर पाच हजार इव्हीएम हॅक करण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने ट्विटरवरून केला आहे. काँग्रेसने याआधीच इव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणूक आयोगाने सातत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.   

 

याआधी इव्हीएमशी छेडछाड करून अनेक निवडणुका जिंकल्याचा आरोप विरोधकांनी भाजपावर केला होता. तोच धागा पकडून, गुजरातमध्येही भाजपा मोठा इव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचे हार्दिक पटेलने शनिवारी म्हटले होते. 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा इव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करणार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केला होता. भाजपाने इव्हीएममध्ये घोटाळा केली नाही तर भाजपाच्या खिशात 82 जागा जातील, असा दावाही हार्दिक पटेल यांनी केला. शनिवारी ट्विटच्या माध्यमातून हार्दिक पटेलने भाजपावर हे आरोप केले. 'शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा इव्हीएम मशिनमध्ये मोठी गडबड करायला चालली आहे. भाजपा गुजरात निवडणूक हारणार आहे. इव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असे हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.  गुजरातची निवडणूक हा भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे इव्हीएममध्ये फेरफार करून ते ही निवडणूक जिंकतील. पण कुणी शंका उपस्थित करू नये, प्रश्न विचारू नयेत म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये हरतील, असं हार्दिक पटेल याने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले होते.   

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017hardik patelहार्दिक पटेल