शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी द्या, भारताची पाकिस्तानकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 20:04 IST

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. 

ठळक मुद्देकुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी द्याभारताने पाकिस्तानकडे केली मागणीकोणताही त्रास दिला जाऊ नये, अशी हमी द्या.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी लवकरच त्यांची आई आणि पत्नी पाकिस्तानात जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारने सातत्याने केलेला पाठपुरावा आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी पाकिस्तानने दिली आहे. दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, त्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, अशी हमी भारताने पाकिस्तानकडे मागितली आहे.

याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना त्यांची कोणतीही चौकशी करण्यात येऊ नये. तसेच, त्यांना कोणताही त्रास दिला जाऊ नये, अशी हमी देण्याची मागणी पाकिस्तानकडे करण्यात आली आहे. कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीशी भेट घडवण्याबद्दल भारत सकारात्मक आहे. जाधव यांच्या आईला मुलाची भेट घ्यायची आहे. अनेक महिन्यांपासून त्यांच्याकडून याबद्दलची इच्छा व्यक्त केली जात आहे, असेही ते म्हणाले.

भारतातील निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या 46 वर्षीय जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश गतवर्षी 13 डिसेंबर रोजी दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस स्थगिती देत पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली होती. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान