शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ला सर्वांचा पाठिंबा

By admin | Updated: August 4, 2016 04:07 IST

जीएसटी विधेयक राज्यसभेत मांडता आल्याने काँग्रेस आणि भाजपकडून राजकीय वैरभाव प्रत्ययास येणाऱ्या राज्यसभेत बुधवारी मात्र अत्यंत सलोख्याचे वातावरण अनुभवास आले.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- भारताच्या आर्थिक क्षमतेची दिशा निश्चित करणारे ‘एक राष्ट्र, एक करप्रणाली’ची मुहूतमेढ रोवणारे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक अखेर राज्यसभेत मांडता आल्याने काँग्रेस आणि भाजपवर स्तुतीसुमने उधळण होणे दोन वर्षापासून राजकीय वैरभाव प्रत्ययास येणाऱ्या राज्यसभेत बुधवारी मात्र अत्यंत सलोख्याचे वातावरण अनुभवास आले. अद्रमुकचे १२ सदस्य वगळता राज्यसभेत ‘एकच ताल आणि सूर’निनादला. जीएसटी पुढच्या वर्षी लागू करण्याचा सरकारचा मानस असला, तरीही जीएसटी २०१८ च्या आधी लागू होणार नाही. किमान दोन वर्षे तरी लागण्याची शक्यता दिसते.पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला जीएसटी लागू करण्याचा सरकारचा इरादा आहे, असे संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले. परंतु, काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांना तसे वाटत नाही. किमान दोन वर्षे तरी लागतील, असे त्यांचे म्हणणे आहे.जीएसटीवर काँग्रेस आणि भाजप दरम्यानच्या वाटाघाटी प्रक्रियेत सहभागी असलेले काँग्रेस जयराम रमेश यांनीही म्हटले की, पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर (२०१९) परिपूर्ण जीएसटी लागू होऊ शकते.आज घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास ते लोकसभेत मांडले जाईल. पुन्हा ते राज्यसभेत आल्यानंतर या घटनादुरुस्ती विधेयकाला किमान १६ राज्यांची मंजुरी मिळणे जरुरी आहे. त्यानंतरच पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल. एकाही राज्याकडून दुरुस्ती आली नाही, तर मार्च २०१७ मध्येच अंतिम मंजुरी मिळेल. अन्यथा, संसदेच्या मंजुरीनंतर हे विधेयक पुन्हा राज्यांकडे जाईल.त्यानंतर केंद्र सरकार एक स्वतंत्र विधेयक (एकात्मिक वस्तू-सेवा विधेयक) आणेल. डिसेंबरमध्ये किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल. या विधेयकात केंद्रीय कर प्रणालीत कोणत्या वस्तूंचा समावेश असेल, याची यादी असेल. तसेच केंद्रीय कर कोणत्या वस्तूंवर लागेल आणि राज्याला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा उल्लेख असेल.त्याचबरोबर प्रत्येक राज्याला स्वत:चे जीएसटी विधेयक मंजुर करून घ्यावे लागेल. यातही राज्य सरकारचा कोणत्या वस्तूंवर कर लागेल, अशा वस्तूंची यादी असेल. पण आंतरराज्य सेवा कराचा तिढा कसा निकाली काढणार? हे अद्याप स्पष्ट नाही. एकूण ३६० हून अधिक वस्तू अगोदरच स्टेट जीएसटीबाहेर ठेवल्या आहेत. तसेच केंद्रीय जीएसटीच्या व्याप्तीतून ७५ वस्तूं बाहेर ठेवण्यात आलेल्या आहेत. तेव्हा वस्तूंच्या यादीत खूप बदल होतील.