शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

GST नंतर रेस्टॉरंटमधील जेवण झालं स्वस्त, सर्वसामान्यांना किती फायदा झाला ते मोदी सरकारनं सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 19:32 IST

खाण्याचे शौकिन असणाऱ्यांसाठी आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन मनसोक्त पोटभर जेवणं करणं याचं सुख काही वेगळचं असतं.

खाण्याचे शौकिन असणाऱ्यांसाठी आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन मनसोक्त पोटभर जेवणं करणं याचं सुख काही वेगळचं असतं. आरामदायी वातावरणात आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला कुणाला नाही आवडणार? पण आपण सध्या रेस्टॉरंटमध्ये खाण्यावर किती खर्च करत आहोत याची तुलना १० वर्षांपूर्वीच्या काळाशी केली तर काही आश्यर्चकारक माहिती समोर आली आहे.

१५० रुपयांची होतेय बचतप्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार रेस्टॉरंट बिलावरील बचतीचे विश्लेषण केलं गेलं आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी आणि नंतर रेस्टॉरंटच्या बिलांची तुलना त्यांनी दाखवली आहे आणि त्याचे परिणाम लक्षवेधी आहेत.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडियानं ट्विटरवर याची माहिती शेअर केली आहे. एक देश, एक कर प्रणालीमुळे रेस्टॉरंटमध्ये खाणं अधिक स्वस्त झालं आहे. प्रत्येकी १ हजार रुपयांच्या रेस्टॉरंटच्या बिलात सुमारे १५० रुपये वाचवता येतील, असा दावा यात करण्यात आला आहे.

काय आहे कॅलक्युलेशन?जानेवारी महिन्यात, जीएसटी अथॉरिटी फॉर अॅडव्हान्सच्या नियमानुसार सिट-इन रेस्टॉरंटसाठी ५ टक्के जीएसटी, टेकअवे आणि डोअरस्टेप डिलिव्हरीसाठी लागू होईल. यामनुसार २०१४ मध्ये रेस्टॉरंटमध्ये १००० रुपयांचं बिल प्रत्यक्षात १३०३.५ रुपये इतकं होतं. यात १० टक्के सर्व्हीस चार्ज, ६.५ टक्के कर, १४.५ टक्के वॅट आणि ०.४ टक्के सेसचा समावेश आहे. यामध्ये कृषी कल्याण सेस आणि स्वच्छ भारत सेस देखील आहे. जीएसटीच्या निर्णयानंतर १० टक्के सेवा शुल्क आणि जीएसटीचा ५ टक्के एकसमान राहील. त्यामुळे एकूण बिलाची रक्कम फक्त रु.११५५ होते. त्यामुळे सरकारी अहवालानुसार ग्राहक सुमारे दीडशे रुपयांची बचत करू शकतात.

जर तुम्ही रेल्वे किंवा IRCTC कडून जेवण ऑर्डर करत असाल तर ५ टक्के जीएसटी भरावा लागेल. त्याचप्रमाणे, स्टँडअलोन रेस्टॉरंट किंवा स्टँडअलोन आउटडोअर केटरिंग सेवेवरही ५ टक्के दराने जीएसटी लागू होतो. दुसरीकडे, जर रेस्टॉरंट किंवा आउटडोअर केटरिंग सेवा एखाद्या हॉटेलशी संबंधित असेल जिथे खोलीचे भाडे ७,५०० रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्या बाबतीतही तुम्हाला ५ टक्के GST भरावा लागेल.

टॅग्स :hotelहॉटेल