शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सगळे रेकॉर्ड ब्रेक! कोरोना संकटात मोठा दिलासा; मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 16:38 IST

एप्रिलमध्ये केंद्राला रेकॉर्डब्रेक जीएसटी; सलग ७ महिने १ लाख कोटीहून अधिक महसूल

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढत आहे. गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना रुग्णांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा कोरोना रुग्णांचा आकडा १ लाखाच्या पुढे गेला. तर आज हा आकडा ४ लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत देशासाठी एक सुखद बातमी आहे. वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून होणाऱ्या महसुलानं सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.एप्रिल महिन्यात कोरोनाचा आकडा प्रादुर्भाव अतिशय वेगानं वाढत असताना आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यात १ लाख ४१ हजार ३८४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून प्रथमच सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे. याआधी मार्च महिन्यात जीएसटीमधून १ लाख २३ हजार ९०२ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटीमधून मिळणारा महसूल १४ टक्क्यांनी वाढला आहे. ...तर भारतातून 'या' देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास, अमेरिकेत जाणाऱ्यांसाठीही नवे निर्बंध!एप्रिलमध्ये जीएसटीच्या माध्यमातून १ लाख ४१ हजार ३८४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यातील २७ हजार ८३७ कोटी रुपये केंद्रीय जीएसटी आहे. तर ३५ हजार ६२१ हजार कोटी रुपये राज्याच्या जीएसटीतून मिळाला आहे. इंटिग्रेटेड जीएसटीच्या माध्यमातून ६४ हजार ४८१ कोटी रुपये (२९ हजार ५९९ कोटी रुपये वस्तूंवरील आयात) आणि सेसच्या माध्यमातून ९ हजार ४४५ कोटी रुपयांचा (९८१ कोटी वस्तूंवरील आयात) महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे गेल्या ७ महिन्यांपासून केंद्राला १ लाख कोटीहून अधिक जीएसटी मिळतो आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGSTजीएसटी