शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल व वीजही येणे आवश्यक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 04:55 IST

जीएसटीमध्ये सध्या केंद्र सरकारला कमी महसूल मिळत आहे. सर्वच वस्तू जीएसटीमध्ये आणल्याने ती चिंता दूर होऊ शकेल, असे मत माजी केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अढीया यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : रिअल इस्टेट उद्योगासह पेट्रोल, वीज, मद्य या बाबी टप्प्याटप्प्याने जीएसटीच्या कक्षेत येणे आवश्यक आहे. यातच सरकार व ग्राहक या दोघांचाही फायदा आहे. जीएसटीमध्ये सध्या केंद्र सरकारला कमी महसूल मिळत आहे. सर्वच वस्तू जीएसटीमध्ये आणल्याने ती चिंता दूर होऊ शकेल, असे मत माजी केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अढीया यांनी एका लेखाद्वारे व्यक्त केले आहे.अढीया यांच्या मते, एकात्मिक जीएसटीअंतर्गत मिळणारा महसूल केंद्र सरकार पहिले पाच वर्षे मोबदल्याच्या रुपात राज्य सरकारांना देणार आहे. त्यामध्ये दरवर्षी १४ टक्के वाढ होत आहे. त्यामुळे जीएसटीअंतर्गत राज्य सरकारांना तरी महसूल कमी होण्याची भीती नाही. पण केंद्र सरकारला ती चिंता सतावते आहे. त्यावर मात करण्यासाठी केंद्राने पुढील पाच वर्षांचे विशेष धोरण आखण्याची गरज आहे.अढीया यांनी असे सुचवले की, सध्या केंद्र व राज्य सरकारांना सर्वाधिक महसूल मिळवून देणारे घटक म्हणजे पेट्रोलडिझेल आहे. सुयोग्य नियोजनाद्वारे पेट्रोल-डिझेल जीएसटीअंतर्गत आणल्यास त्यातून केंद्र सरकारला चांगला महसूल मिळेल. इंधनाचे दरही कमी होतील. त्यानंतर विजेचे बिल व मद्य जीएसटी कक्षेत आणावे. सध्या मद्यावर फक्त राज्य सरकार कर आकारते. त्यामुळे जीएसटीसुद्धा फक्त राज्य सरकारनेच आकारायला हरकत नाही. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये मद्याची किंमतही एकसारखी होईल.हव्यात दोनच श्रेणीप्रत्येक वस्तू या दोन श्रेणीत असल्यास संपूर्ण देश खऱ्या अर्थाने जीएसटीच्या अंमलाखाली असेल, असे अढीया यांचे मत आहे.‘जीएसटी’ येऊनही देशभर एकसमान कर नाही. सध्या या कराच्या चार श्रेणी आहेत, पण टप्प्याटप्प्याने या श्रेणी दोनवर आणाव्यात.

टॅग्स :GSTजीएसटीPetrolपेट्रोलDieselडिझेलelectricityवीज