शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीत ४० हजार कोटी तुटीचा अंदाज; मंदीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 06:54 IST

बाजारातून उसनवारी करण्याची शक्यता

नवी दिल्ली : देश आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडल्यामुळे जीएसटी संकलन वित्त वर्ष २०१९-२० मधील अंदाजापेक्षा ४० हजार कोटींनी कमी राहील, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. कर वृद्धी १४ टक्क्यांच्या खाली असल्यास राज्य सरकारांना भरपाई देण्याचे बंधन केंद्रावर असल्याने महसुलावरील दबाव आणखी वाढणार आहे.एका राज्याच्या वित्तमंत्र्याने सांगितले की, गोव्यातील जीएसटी परिषदेत केंद्राने जीएसटीमध्ये ४० हजार कोटी रुपयांची तूट निर्माण होण्याची अपेक्षा असल्याची माहिती दिली. बहुतांश राज्यांनी मात्र सरकार काही तरी मार्ग काढेल, असा आशावाद व्यक्त केला. मार्ग न निघाल्यास मात्र त्यांना बाजारातून उसनवाऱ्या करणे भाग पडेल.अनेक घटकांमुळे देशातील आर्थिक वृद्धीला खीळ बसली आहे. एप्रिल-जून तिमाहीत जीडीपीचा वृद्धीदर सहा वर्षांच्या नीचांकावर जाऊन ५ टक्के झाला आहे. त्यामुळे वाढीव महसूल मिळण्याच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारांतील करारानुसार जीएसटीची वार्षिक वृद्धी १४ टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यास केंद्राकडून राज्यांना पाच वर्षांपर्यंत नुकसान भरपाई मिळेल. कायद्यानुसार, जेथे उपकर वसूल होतो तेथील निधून ही भरपाई राज्यांना मिळते.२०१९-२० मध्ये घातक आणि चैनीच्या वस्तू यावरील उपकरापोटी १ लाख कोटी रुपयांचा महसूल केंद्र सरकारला मिळण्याची अपेक्षा आहे. दर महिन्याला ही रक्कम सुमारे ८ हजार कोटी रुपये होते. ऑगस्टमधील संकलन ७,२७२ कोटी रुपये राहिले. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदीपेक्षा कमी जीएसटी वसूल होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे.राज्यांना भरपाई अधिक काळ हवीवर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत केंद्राने ४५,७८४ कोटी रुपयांची भरपाई राज्यांना दिली आहे. भरपाईचा कालावधी आणखी तीन वर्षांनी वाढविण्याची मागणीही जवळपास सर्वच राज्यांनी केली आहे. जीएसटीमुळे अन्य कर रद्द झाल्याने राज्यांच्या महसुलावरही परिणाम झाला आहे.

टॅग्स :GSTजीएसटी