शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

जीएसटी संकलनाचा झाला उच्चांक; डिसेंबरमध्ये झाली व्यवसायामध्ये वृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 07:05 IST

१.१५ लाख कोटींचे संकलन : डिसेंबरमध्ये झाली व्यवसायामध्ये वृद्धी

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यामध्ये देशभरातून जमा झालेल्या वस्तू आणि सेेवा कराने (जीएसटी) आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम मिळविली आहे. सलग तिसऱ्या महिन्यामध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा एकदा गतिमान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे शुक्रवारी डिसेंबर महिन्यामधील जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये १,१५,१७४ लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाल्याचे जाहीर झाले आहे. जीएसटी लागू झाल्यापासून झालेले हे सर्वाधिक संकलन आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या करसंकलनापेक्षा यंदा १२ टक्के अधिक कर जमा झाला आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये १,०३,१८४ कोटी रुपयांचा जीएसटी संकलित झाला होता.

मार्च महिन्यामध्ये कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी, सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांना मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे ही वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. 

सलग तीन महिने लाख कोटींचा टप्पा पार

देशामध्ये १ जुलै, २०१७ रोजी जीएसटी करप्रणाली लागू करऱ्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत संकलित झालेल्या प्रत्येक महिन्याच्या जीएसटीमध्ये डिसेंबर, २०२०मध्ये संकलित कर हा सर्वाधिक आहे. या आधी एप्रिल, २०१९ मध्ये संकलित झालेला १,१३,८६६ कोटी रुपये हा जीएसटी सर्वेाच्च होता, तर एप्रिल, २०२० मध्ये संकलित ३२,१७२ कोटी रुपयांचा जीएसटी हा नीचांक आहे.  डिसेंबर, २०२०मध्ये संकिलत झालेला जीएसटी हा गेल्या २१ महिन्यांमधील उच्चांकी आहे. त्याचप्रमाणे, गेल्या तीन महिन्यांमध्ये जीएसटी संकलनाने १ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे, हे वैशिष्ट्य आहे.

आयातीवरील करामध्ये २७ टक्के वाढ 

डिसेंबर महिन्यामध्ये संकलित झालेल्या जीएसटीमध्ये आयात वस्तुंवरील कर मागील वर्षापेक्षा २७ टक्के तर देशांतर्गत उलाढलीवरील कर संकलन ८ टक्क्यांनी वाढले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. डिसेंबरच्या संकलनामध्ये केंद्रीय जीएसटी २१,३६५ कोटी, राज्यांचा जीएसटी २७,८०४ कोटी रुपये जमा झाला आहे. इंटिग्रेटेड जीएसटी ५७,४२६ कोटी रुपये असून, सेस ८,५७९ कोटी रुपये जमा झाल्याचे सूत्रांनी जाहीर केले. 

टॅग्स :GSTजीएसटीbusinessव्यवसाय