शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

धन धना धन! कोरोना संकटात मोदी सरकारसाठी पॉझिटिव्ह बातमी; हॅटट्रिकमुळे देशाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 19:35 IST

मोदी सरकारला कोरोना संकटात दिलासा; जीएसटीमधून मोठा महसूल

नवी दिल्ली: नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं दणका दिला. मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोना लाटेनं टोक गाठलं. देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्यानं लॉकडाऊन करावा लागला. त्यानंतर आता हळूहळू देशाची अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली आहे. सप्टेंबरमध्ये देशाला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून १ लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. 

सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारला जीएसटीमधून १.१७ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. लागोपाठ तिसऱ्या महिन्यात सरकारला जीएसटीमधून १ लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल प्राप्त झाला आहे. ऑगस्टमध्ये सरकारला जीएसटीमधून १.१२ लाख कोटींचा महसूल मिळाला होता. जुलैमध्ये हाच आकडा १.१६ लाख कोटी होता. त्याआधी जूनमध्ये जीएसटीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत ९२ हजार ८४९ कोटी रुपये जमा झाले होते. एप्रिल आणि मे महिन्यातही जीएसटीतून मिळालेलं उत्पन्न १ लाख कोटींहून अधिक होतं.

गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात २३ टक्के वाढगेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत जीएसटीमधून मिळणारं उत्पन्न २३ टक्क्यांनी वाढलं आहे. तर २०१९ च्या सप्टेंबरच्या तुलनेत महसुलात झालेली वाढ २७ टक्के इतकी आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये मिळालेल्या महसुलासोबतच अर्थ मंत्रालयानं ई-वे बिलची आकडेवारीदेखील प्रसिद्ध केली आहे. ऑगस्टमध्ये ६.५८ कोटी ई-वे बिल तयार झाली. जुलैमध्ये हाच आकडा ६.४१ कोटी होता. विशेष म्हणजे कोविडशी संबंधित अनेक वैद्यकीय साहित्यांवर सूट दिल्यानंतरही सरकारला मिळणारा महसूल वाढला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGSTजीएसटी