शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘जीएसटी’ मंजुरीचा मार्ग झाला मोकळा?

By admin | Updated: June 20, 2016 05:08 IST

बहुचर्चित जीएसटी (वस्तू व सेवाकर) विधेयक राज्यसभेत मंजूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जीएसटीच्या दरावर १८ टक्क्यांची कमाल मर्यादा न घालण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही अनुकूल

नवी दिल्ली : बहुचर्चित जीएसटी (वस्तू व सेवाकर) विधेयक राज्यसभेत मंजूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जीएसटीच्या दरावर १८ टक्क्यांची कमाल मर्यादा न घालण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही अनुकूल असून, या मुद्यावर आता काँग्रेस एकाकी पडण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या मुद्यावर राजकीय मतभेद कायम असल्यामुळे हे विधेयक अद्याप राज्यसभेत मंजूर होऊ शकलेले नाही. जीएसटीच्या काही नियमांवर काँग्रेसने बोट ठेवलेले आहे; पण आता जीएसटीच्या दरावर १८ टक्क्यांची कमाल मर्यादा न घालण्यास माकप अनुकूल असल्याचे वृत्त आहे. जीएसटीबाबत कोणतीही सीमा निश्चित करण्याची गरज नसल्याचे सरकारचे मत आहे. कारण, असे केल्यास भविष्यात दरातील संशोधनासाठी प्रत्येक वेळी संसदेच्या मान्यतेची गरज भासेल. माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि लोकसभेतील नेते मोहंमद सलीम म्हणाले की, याबाबत काँगे्रस काय म्हणत आहे किंवा याचे काय पडसाद उमटतील याचा आम्ही विचार करीत नाही. सरकारने सभागृहात कराचे दर कमी ठेवण्याची हमी दिली, तर आम्हाला आनंदच होईल. काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असे संकेत दिले होते की, जीएसटीला काही पक्षांकडून पाठिंबा मिळू शकतो. दरम्यान, हे विधेयक जेव्हा मंजुरीसाठी समोर येईल, तत्पूर्वी डावे पक्ष आणखी काही अटी घालू शकतात. तथापि, राज्यांना जीएसटीबाबत अधिक अधिकार देण्याची काँगे्रसची मागणी सरकार मान्य करू शकते, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, आम्ही जीएसटीच्या विरोधात नाहीत. ग्राहकांच्या बाजूचे विधेयक आम्हाला हवे आहे. दोन दिवसांपूर्वीच जेटली यांनी स्पष्ट केले होते की, जीएसटीच्या मुद्यावर काँग्रेसला वेगळे पाडण्याचा आमचा विचार नाही. याबाबत केंद्र सरकार आणि प्रादेशिक पक्ष यांच्यात मतभेद नसल्याचेही ते म्हणाले. कसे आहे गणित? जीएसटीचे विधेयक मंजूर होण्यासाठी १६४ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. सभागृहात एकूण २४५ सदस्य असून, त्यापैकी दोनतृतीयांश सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजपसोबत असलेले प्रादेशिक पक्षांचे सदस्य आणि आता डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्यास सरकार हे विधेयक मंजूर करून घेऊ शकते, असा अंदाज आहे.