शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी विधेयक एकमताने मंजूर व्हावे, हीच केंद्राची अपेक्षा

By admin | Updated: March 29, 2017 01:13 IST

वस्तू व सेवा कराशी संबंधित ४ विधेयकांना सर्वपक्षीय सहमतीने मंजूर करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे. बुधवारी लोकसभेत या

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीवस्तू व सेवा कराशी संबंधित ४ विधेयकांना सर्वपक्षीय सहमतीने मंजूर करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे. बुधवारी लोकसभेत या विषयावर चर्चेसाठी ७ तासांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. तथापि ज्या स्वरूपात ही विधेयके संसदेत सरकारने सादर केली आहेत, ती काँग्रेसला मंजूर नाहीत. साहजिकच सरकारला अपेक्षित सहकार्य, संसदेतला सर्वांत मोठा विरोधी पक्ष काँग्रेसकडून मिळण्याची शक्यता दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपा खासदारांच्या बैठकीला संबोधित करताना अर्थमंत्री अरुण जेटलींनी वस्तू व सेवा करासंबंधी चार विधेयकांचे स्वरूप मंगळवारी समजावून सांगितले. जेटली म्हणाले, ‘जीएसटी ही देशातली ऐतिहासिक करसुधारणा असून, जुलै महिन्यापासून ती लागू करण्याचा सरकारचा इरादा आहे. जीएसटी कौन्सिलशी विचार-विनिमय केल्यानंतर जीएसटीशी संबंधित प्रस्तुत विधेयकांचा मसुदा केंद्र व राज्यांच्या सामुदायिक सार्वभौमत्वाचा विचार करूनच तयार करण्यात आला आहे. या करप्रणालीमुळे ‘एक राष्ट्र एक कर’ असे पर्व भारतात सुरू होणार आहे. सामान्य माणसापासून राज्य सरकारपर्यंत व केंद्र सरकारपासून कर व्यवस्थेपर्यंत सर्वांनाच त्याचा मोठा लाभ होणार आहे.’ बैठकीला भाजपा खासदारांव्यतिरिक्त पक्षाध्यक्ष अमित शाह व अलीकडेच भाजपामधे प्रवेश केलेले माजी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस.एम. कृष्णा उपस्थित होते. सोमवारी सादर करण्यात आलेल्या ४ विधेयकांवर लोकसभेत बुधवारी चर्चा सुरू होईल. संभवत: त्याच दिवशी चर्चेअंती ती मंजूर व्हावीत, असा सरकारचा प्रयत्न आहे. तथापि चर्चा लांबल्यास लोकसभेत ती गुरुवारी मंजूर होतील व राज्यसभेत पाठवली जातील. सर्वांच्या सहमतीने ही विधेयके मंजूर व्हावीत, अशी सरकारची इच्छा आहे; मात्र राज्यसभेत सरकारकडे बहुमत नाही. विधेयकांच्या मंजुरीसाठी विरोधकांचे सहकार्य मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न सरकारने चालवला आहे.स्वरूप काँग्रेसला अमान्यकाँग्रेस खासदारांच्या बैठकीत उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, वस्तू व सेवा कराच्या विरोधात काँग्रेस पक्ष नाही; मात्र प्रस्तुत विधेयके ज्या स्वरूपात लोकसभेत सादर करण्यात आली आहेत, ते स्वरूप काँग्रेसला मंजूर नाही. विद्यमान करप्रणालीत देशव्यापी सुधारणा करताना जनतेच्या मनात काही रास्त शंका प्रस्तावित कायद्याविषयी आहेत. या शंकांबाबत काँग्रेस खासदारांनी सभागृहात ठोस मुद्दे उपस्थित करावेत. सरकारी विधेयकात दुरुस्त्या घडवून आणण्याची मागणी करावी.