शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व माजी पंतप्रधानांचं संग्रहालय उभारणार; काँग्रेसवर निशाणा साधत मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 20:53 IST

मोदींची काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका

नवी दिल्ली: एका जमातीनं माजी पंतप्रधानांची प्रतिमा खराब करण्याचं काम केल्याचं म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोदींनी हा आरोप केला. आपलं सरकार सर्व माजी पंतप्रधानांचं एक संग्रहालय उभारेल, अशी घोषणादेखील पंतप्रधानांनी यावेळी केली. माजी पंतप्रधानांसोबतच अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचेदेखील प्रयत्न काहींकडून करण्यात आले, असा दावा करत मोदींनी काँग्रेसवर नाव न घेता टीका केली. 'चंद्रशेखर यांची कामगिरी लोकांच्या मनातून पुसली जाईल, असे प्रयत्न केले गेले. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांची कशी प्रतिमा लोकांसमोर आणण्याचे प्रयत्न केले गेले?' असा सवाल मोदींनी उपस्थित केला. लालबहादूर शास्त्री जीवंत राहिले असते, तर त्यांची प्रतिमादेखील डागाळली गेली असती, असा दावा मोदींनी केला.  चंद्रशेखर यांच्या विरोधात कट कारस्थान रचण्यात आलं, असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी केला. आज एखादा लहान मोठा नेता १०-१२ किलोमीटरची पदयात्रा काढतो, तरीही त्याला वर्तमानपत्रात जागा मिळते. टीव्हीवर दिवसभर ती पदयात्रा दाखवली जाते. मात्र चंद्रशेखर यांनी गरिब शेतकऱ्यांसाठी काढलेल्या पदयात्रेला फारसं महत्त्वच देण्यात आलं नाही. त्यांच्या विचारांना विरोध असू शकतो. मात्र जाणूनबुजून त्यांची यात्रा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन चर्चेत ठेवण्यात आली, असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेस