शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवानं 'तिलक'चे ११ लाख रुपये केले परत, सासऱ्यांच्या डोळ्यांत पाणी; कडकडून मिठी मारली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:46 IST

लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाला 'तिलक' म्हणून लाखो रुपयांची बरसात करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे.

जयपूर-

राजस्थानमध्ये आता विवाह सोहळ्यांमधील प्रथा-परंपरांना छेद देत सामाजिक भान जपण्याच्या दृष्टीनं मोठा बदल घडताना पाहायला मिळत आहे. लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाला 'तिलक' म्हणून लाखो रुपयांची बरसात करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. यात मुलीच्या वडीलांची संपूर्ण आयुष्याची पुंजी लग्नात हुंडा म्हणून खर्च होते. पण आता समाजात हुंडा घेणं किती चुकीचं आहे याबाबतची जनजागृती झाल्यानंतर याचं प्रमाण देखील कमी झालं आहे. तिलक स्वरुपात दिलेला ११ लाख रुपयांचा हुंडा नवरदेवानं वधूच्या वडीलांना परत करुन समाजासमोर आदर्श निर्माण केल्याची एक घटना समोर आली आहे. 

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका लग्न सोहळ्यात वधूच्या पित्यानं नवरदेवाला हुंड्याच्या निमित्तानं ११ लाख रुपयांची रक्कम 'तिलक' म्हणून देऊ केली. पण नवरदेव आणि त्याच्या वडीलांनी संपूर्ण रक्कम वधूच्या वडीलांना परत केली. नवरदेव शैलेंद्र सिंह राठोड आणि त्याचे वडील विजय सिंह राठोड यांनी दाखवलेलं सामाजिक भान याचं परिसरात जोरदार कौतुक केलं जात आहे. राजस्थानमध्ये याआधी देखील अशी उदाहरणं समोर आली आहेत. 

मूळचे राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील किशनपुरा येथील रहिवासी असलेले विजय सिंह राठोड जयपूरमध्ये राहतात आणि मालमत्ता व्यवसायाशी निगडीत ते काम करतात. विजय सिंह यांची पत्नी समुन शेखावत शिक्षिका आहेत. तर मुलगा म्हणजेच नवरदेव शैलेंद्र सिंह जयपूरच्या विद्युत वितरण निगम लिमिटेडमध्ये अकाऊन्टंट पदावर कार्यरत आहे. शैलेंद्रचा ५ फेब्रुवारी रोजी जयपूरच्या जोधपुरा येथील रहिवासी सुरेंद्र सिंह शेखावत यांची मुलगी कंचन शेखावत हिच्यासोबत विवाह झाला. कंचन उच्चशिक्षित असून एमएससी व बीएडपर्यंतचं शिक्षण तिनं पूर्ण केलं आहे. तसंच नेट परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. 

भावूक होऊन वधुच्या वडिलांनी व्याहींना मारली मिठीलग्नात वधूचे वडील सुरेंद्र सिंह शेखावत यांनी नवरदेव शैलेंद्र सिंह याला तिलक म्हणून ११ लाख रुपये रोकड देऊ केले. पण नवरदेव आणि त्याच्या वडीलांनी ते सन्मानानं परत केले. शैलेंद्र सिंह यांनी घेतलेल्या निर्णयाचं उपस्थितांनी कौतुक केलं. तर वधूचे वडील सुरेंद्र शेखावत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी नवरदेवाच्या वडीलांना कडकडून मिठी मारली आणि आभार व्यक्त केले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानdowryहुंडा