शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अनंतनागच्या बिजबेहरामध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 6 नागरिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 15:12 IST

दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहरामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांच्या या ग्रेनेड हल्ल्यात 6 स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीर- दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहरामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांच्या या ग्रेनेड हल्ल्यात 6 स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांच्या गाडीला यावेळी लक्ष्य केलं आहे. परंतु त्यांचा निशाणा चुकला आणि ग्रेनेडचा रस्त्यावर पडून स्फोट झाला. या हल्ल्यात 6 लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा जवानांनी पूर्ण परिसराला घेराव घातला असून, दहशतवाद्यांची धरपकड सुरू केली आहे.जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तान गेल्या 6 दिवसांपासून लागोपाठ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवानही शहीद झाले आहेत. अरनिया आणि सांबा सेक्टरनंतर पाकिस्तानी रेंजर्सचा आरएसपुरामध्येही गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात सकाळपासून आतापर्यंत 4 नागरिकांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी कथुआ जिल्ह्यातल्या हिरानगर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारात राम पॉल नावाच्या नागरिकाचा मृत्यू झाला.पाकिस्ताननं आतापर्यंत बीएसएफच्या जवळपास 40 चौक्यांना लक्ष्य केलं आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचाही मारा करण्यात येतोय. मृत नागरिकांमध्ये तीन जण हिरानगर सेक्टरमधल्या लोदी गावातले असून, एक जण अरनिया सेक्टरमधला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता.

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला