शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शरद यादव यांचा पक्षविरोधी सूर, अहमद पटेलांना दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 14:28 IST

संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी बुधवारी टि्वटकरुन काँग्रेस नेते अहमद पटेल यांना गुजरात राज्यसभा निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली, दि. 9 - संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी बुधवारी टि्वटकरुन काँग्रेस नेते अहमद पटेल यांना गुजरात राज्यसभा निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. शरद यादव यांनी अशा प्रकारचे टि्वट करुन थेट पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. कारण जदयूचे सर्वोच्च नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुजरातमधील जदयूच्या एकमेव आमदाराला भाजपा उमेदवार बलवंतसिंह राजपूत यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. शरद यादव यांच्या टि्वटवरुन त्यांच्यात आणि नितीश कुमारांमधील अंतर्गत मतभेदांची दरी  अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होते. 

मागच्या महिन्यात  नितीश कुमार काँग्रेस आणि राजदबरोबरच्या महाआघाडीतून बाहेर पडले आणि भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असल्याने नितीश कुमारांनी गुजरातमधील आपल्या आमदाराला अहमद पटेल यांच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश दिले होते. जदयूचे आमदार छोटूभाई वासवा यांनी कोणाला मतदान केले ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपाने गरीबांसाठी फार काही केलेले नाही त्यामुळे आपण अहमद पटेल यांना मतदान केले असे सांगितले. नितीश कुमारांचा सत्ता स्थापनेसाठी भाजपासोबत जाण्याचा निर्णय शरद यादव यांना अजिबात पटलेला नाही. आघाडी झाली त्यावेळी सुद्धा त्यांनी नितीश कुमारांवर टीका केली होती. 

मंगळवारी रात्री गुजरात राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी बाजी मारली. त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपाने कसलेली कंबर, पक्षातील आमदारांमध्ये पडलेली फूट आणि प्रत्यक्ष निवडणुकी दिवशी रंगलेले राजकीय नाट्य या सर्वांवर मात करत अहमद पटेल यांनी विजय मिळवला. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपाच्या अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.काल गुजरात राज्यसभेच्या दिवसभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर रात्री निवडणूक आयोगाने क्रॉस व्होटिंग करणाऱ्या वाघेला गटातील दोन आमदारांचे मत रद्द करण्याचा निर्णय दिला.