शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सबरीमालात प्रचंड गर्दी; केरळात १२ तासांचा बंद, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 5:38 AM

मल्याळी वृश्चिकोम महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात दर्शनासाठी तुफान गर्दी उसळली.

पंबा/संनिधानम (केरळ) : मल्याळी वृश्चिकोम महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात दर्शनासाठी तुफान गर्दी उसळली. अय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काही संघटनांनी केरळात १२ तासांचा बंद पुकारल्यामुळे काही शहरांत जनजीवन विस्कळीत झाले.दोन महिन्यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी मंदिर उघडले. पहाटे तीन वाजता नवे मेलशांती (मुख्य पुजारी) वासुदेवन नंबुद्री यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक पूजाविधींना सुरूवात झाली. दर्शनासाठी मंदिराबाहेर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात अभूतपूर्व बंदोबस्त लावण्यात आला आहे. गर्दी लक्षात घेऊन केरळ परिवहन महामंडळाने बसची व्यवस्था केली आहे. या बसगाड्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन सुरूच आहे. हिंदू ऐक्य वेदीच्या प्रदेशाध्यक्ष के. पी. शशिकला यांना शुक्रवारी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी अटक केली. रात्री मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असताना त्यांनी मंदिरात प्रवेशाचा हट्ट धरल्याने त्यांना अटक करण्यात आली. अन्य एका संघटनेच्या नेत्यासही अटक करण्यात आली आहे. यावरून काही संघटनांनी १२ तासांच्या केरळ बंदची हाक दिली आहे. (वृत्तसंस्था)बंदमुळे लोकांना त्रासबंदमुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळ दिसून आली नाही. बलरामपुरम येथे एका बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. तिरुवनंतपुरममध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. रुग्णालयांनाही आंदोलनाचा फटका बसला.अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचू शकले नाहीत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सरकार सबरीमाला यात्रा संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष एस. जे. आर. कुमार यांनी शशिकला यांच्या अटकेचा निषेध केला.

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरKeralaकेरळ