शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळेच महाआघाडी सत्तेपासून वंचित; भाजपाशी थेट लढतीतही दारुण अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 07:08 IST

काँग्रेस नेते अविनाश पांडे हे फक्त सहायकाच्या भूमिकेत दिसले.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) नेतृत्वाखालील महाआघाडीतल्या काँग्रेस पक्षाने सर्वात खराब कामगिरी केली आहे. त्यामुळेच महाआघाडीला सत्ता  मिळू शकलेली नाही. काँग्रेसने लढविलेल्या ७० जागांपैकी फक्त  १९ जागांवर या पक्षाला विजय मिळाला. 

काँग्रेसची ७० पैकी ३७ जागांवर भाजपशी थेट लढत झाली. त्यातील फक्त ७ जागा काँग्रेसला जिंकता आल्या. जनता दल (यू.) पक्षाच्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने १० जागा जिंकल्या. बिहारमध्ये लढविलेल्या जागांपैकी काँग्रेसला ५१ जागांवर पराभव पत्करावा लागला. बिहार निवडणुकीच्या काँग्रेस रणनीतीची सारी सूत्रे रणदीप सुरजेवाला यांच्या हाती सोपविण्यात आली होती.

काँग्रेस नेते अविनाश पांडे हे फक्त सहायकाच्या भूमिकेत दिसले. हमखास हरतील असे उमेदवार काँग्रेसने वीस जागांवर उभे केले  होते असा आरोप त्या पक्षाच्या  काही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी  केला. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांत एनडीएने १२५ जागांवर जिंकल्या असून त्यांना निसटते बहुमत मिळाले. 

निवडणुका पूर्वतयारी फक्त दोन महिने आधी?

बिहारच्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने एक वर्ष आधीपासून पूर्वतयारी करणे अपेक्षित होते; पण त्या दिशेने पक्षाने निवडणुकांच्या दोन महिने आधी हालचाली केल्या, असा आरोपही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस