शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

ग्रा.पं.कर्मचार्‍यांची जि.प.वर धडक

By admin | Updated: February 22, 2016 19:28 IST

जळगाव- ग्रा.पं.कर्मचार्‍यांना शासन निर्देशानुसार वेतन मिळावे, राहणीमान भत्ता लागू करावा, वेतन थकीत असलेल्या कर्मचार्‍यांना तातडीने वेतन द्यावे, भविष्य निर्वाह निधी न भरणार्‍या ग्रा.पं.वर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रा.पं.कर्मचारी महासंघाच्या (आयटक) नेतृत्वामध्ये सोमवारी दुपारी जि.प.वर मोर्चा काढण्यात आला.

जळगाव- ग्रा.पं.कर्मचार्‍यांना शासन निर्देशानुसार वेतन मिळावे, राहणीमान भत्ता लागू करावा, वेतन थकीत असलेल्या कर्मचार्‍यांना तातडीने वेतन द्यावे, भविष्य निर्वाह निधी न भरणार्‍या ग्रा.पं.वर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रा.पं.कर्मचारी महासंघाच्या (आयटक) नेतृत्वामध्ये सोमवारी दुपारी जि.प.वर मोर्चा काढण्यात आला.
तत्पूर्वी आयटकच्या पदाधिकार्‍यांसह मोर्चेकर्‍यांची भाकपाच्या बळीराम पेठेतील कार्यालयात बैठक झाली. त्यात जेएनयुमध्ये देशविरोधी घोषणांच्या आरोपांखाली अटक केलेल्या कन्हैया कुमारला मुक्त करावे, तो देशद्रोही नाही, त्याने मोदी सरकारचा धर्मनिरपेक्षताविरोधी अजेंडा हाणण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या धोरणांवर बोट ठेवले, आरएसएसवाद समोर आणला म्हणून त्याला अटक केली. त्याला मुक्त करावे, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. आयटकचे अमृतराव महाजन, वासुदेव वारके, आबा पाटील, राजू कोळी, शिवशंकर महाजन यांच्यासह ग्रा.पं.चे कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर जि.प.वर मोर्चा काढण्यात आला. ग्रा.पं.कर्मचार्‍यांना न्याय मिळेल का..., ग्रा.पं. कर्मचार्‍यांना वेठीस धरणार्‍या ग्रा.पं.चा निषेध आदी घोषणा देण्यात आल्या. सीईओ, ग्रा.पं. विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. त्यात विविध मागण्या करण्यात आल्या.

मागण्या अशा- शासनाने ग्रा.पं.कर्मचार्‍यांना किमान वेतन ५१०० ते ७१०० रुपये व विशेष भत्ता लागू केला. १४५० रुपये विशेष भत्ता वाढविला. पण ग्रा.पं.अदा करीत नाहीत. फरक दिला जावा. ग्रा.पं.च्या सफाई कर्मचार्‍यांना किमान वेतनापासून वंचित ठेवले आहे. त्यांना राहणीमान भत्ताही लागू केला नाही. तो तातडीने लागू केला जावा. कोळन्हावी, शिरागड आदी ग्रा.पं.च्या कर्मचार्‍यांना ३०-३० महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. या प्रकाराची दखल घेतली जावी. एक हजार पेक्षा अधिक ग्रा.पं.कर्मचार्‍यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडलेले नाही. ही खाती उघडली जावीत. सेवा ज्येष्ठता यादी जाहीर करावी, ग्रा.पं.कर्मचार्‍यांचे अनुदान त्यांच्या नावाने जमा केले जावे, सेवा पुस्तिकांमधील नोंदी तातडीने कराव्यात, ग्रा.पं. कर्मचार्‍यांचे गणवेश, बोनस, हातमोजे, गमबूट, साबण व इतर साहित्य मागील फरकासह द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या.