शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 07:25 IST

NEET Exam: एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेतील १,५६३ उमेदवारांना सवलतीचे (ग्रेस) गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या उमेदवारांना २३ जून रोजी पुन्हा चाचणी देण्याचा पर्याय दिला जाईल.

नवी दिल्ली - एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेतील १,५६३ उमेदवारांना सवलतीचे (ग्रेस) गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या उमेदवारांना २३ जून रोजी पुन्हा चाचणी देण्याचा पर्याय दिला जाईल. यापैकी ज्या उमेदवारांनी फेरचाचणी न दिल्यास ग्रेस गुण वगळून मूळ गुणांच्या आधारे निकाल दिला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.

नीट-युजीतील पेपरफुटी व इतर गैरप्रकारांमुळे ही परीक्षा रद्द करण्यासह ग्रेस गुणांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल होत्या. त्यावर न्यायमूर्ती विक्रम नाथ व संदीप मेहता यांच्या  खंडपीठापुढे सुनावणी झाली. याआधी खंडपीठाने परीक्षा रद्द न करता प्रवेशासाठीच्या समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देणार नसल्याचे म्हटले होते. तसेच केंद्र सरकार व एनटीएला उत्तर देण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी केंद्राच्या वकिलांनी बाजू मांडली. 

गैरप्रकार उघड करणारे अलख पांडे कोण आहेत? नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि १५६३ उमेदवारांना ग्रेस गुण देण्याविरोधात लढा देत अलख पांडे यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले. पांडे हे फिजिक्सवाला या नामवंत कोचिंग क्लासेसचे संस्थापक आहेत.  २०२० मध्ये पांडे यांनी किफायतशीर दरात विद्यार्थ्यांना जेईई-नीट परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी फिजिक्सवाला कोचिंगची स्थापना केली. २०१५ मध्ये आयआयटी कानपूर येथून बी.टेकची पदवी घेतल्यानंतर तिथेच विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये यूट्युबच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. बघता-बघता त्यांची लोकप्रियता इतकी वाढली, सध्या त्यांच्या यूट्युबचे ६९ लाख सबस्क्रायबर आणि ५० लाख ॲप डाऊनलोड झाले आहेत.

नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) २३ जूनला फेरपरीक्षेचे आयोजन केले आहे. दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या वेळेत परीक्षा होईल. पुनर्परीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर केला जाईल आणि एमबीबीएस, बीडीएस, इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे समुपदेशन ६ जुलैपासून सुरू होईल, असे केंद्र सरकारने सांगितले. याचिकेवरील पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे. 

बंगालमध्ये निदर्शने नीट-यूजी परीक्षेतील कथित अनियमिततांबद्दल पश्चिम बंगाल उच्च शिक्षण विभागाच्या सॉल्ट लेक येथील मुख्यालयाजवळ ‘ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन’च्या सदस्यांनी निदर्शने केली. विकास भवनाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून दूर नेले.

संसदेत काँग्रेस प्रश्न उपस्थित करणार  काँग्रेसने नीट परीक्षेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. याचा संताप संसदेतही घुमेल असे सांगितले. काँग्रेसने एनटीएच्या महासंचालकांना हटविण्याची मागणीही केली. 

नीट-यूजी परीक्षेत पेपर फुटल्याचा कोणताही पुरावा नाही. विरोधकांकडून केले जाणारे आरोप निराधार आहेत. एनटीए ही अतिशय विश्वासार्ह संस्था आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे आणि आम्ही त्याच्या निर्णयाचे पालन करू. कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.- धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय