शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या वाहनांवर जीपीएसची नजर; आयोगाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 03:41 IST

कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाला आळा; यापूर्वी आमदाराच्या घरात आढळली होती मशिन्स

नवी दिल्ली : सात टप्प्यांत पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकांत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) व व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीहीपॅट) यंत्रांची वाहतूक करणाºया वाहनांवर जीपीएसद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. ही माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.गेल्या वर्षी पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत काही ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे हॉटेल, रस्त्यांवर तसेच एका आमदाराच्या घरात ठेवल्याचेही आढळून आले होते. त्यामुळे हे पाऊल उचलले आहे.यासंदर्भात प्रत्येक राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची वाहतूक करणाºया वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी त्यांची ने-आण होते आहे की नाही यावर बारीक लक्ष ठेवता येईल. तसेच काही गैरप्रकार झाल्यास त्वरित कारवाई करणेही सोपे जाईल.आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये निवडणूक आयोग देशभरात १०.३५ लाख मतदान केंद्रे उभारणार आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत हाच आकडा ९.२८ लाख इतका होता. याचा अर्थ येत्या निवडणुकांत मतदान केंद्रांची संख्या १०.१ टक्क्यांनी वाढणार आहे.निवडणूक आयोगाने गेल्या काही महिन्यांत देशभरातील मतदान केंद्रांच्या ठिकाणांची फेरआखणी केल्याने बदल झाला.लोकसभा निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत विविध टप्प्यांत पार पडणार असून त्यांचा निकाल २३ मेला जाहीर होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVVPATव्हीव्हीपीएटीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग