घरपी भरायला जाणार्या महिलेचे दागिने लांबवले?
By admin | Updated: March 15, 2016 00:33 IST
जळगाव : घरपीची रक्कम भरायला जाणार्या एका महिलेचे दागिने व रोकड दोन अज्ञात महिलांनी हिसकावून घेतल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात घडल्याची जोरदार चर्चा शहरात होती. परंतु या घटनेला पोलीस प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकला नाही.
घरपी भरायला जाणार्या महिलेचे दागिने लांबवले?
जळगाव : घरपीची रक्कम भरायला जाणार्या एका महिलेचे दागिने व रोकड दोन अज्ञात महिलांनी हिसकावून घेतल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात घडल्याची जोरदार चर्चा शहरात होती. परंतु या घटनेला पोलीस प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकला नाही.समजलेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी असलेली एक महिला घरपीची रक्कम भरण्यासाठी नानीबाई हॉस्पिटलजवळील प्रभाग समिती क्रमांक दोनच्या कार्यालयात जात होती. रस्त्यात दोन अज्ञात महिलांनी तिला अडवून तिच्याकडून रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून घेत पोबारा केला. या घटनेनंतर त्या महिलेने आरडाओरड केल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली, अशी जोरदार चर्चा त्या परिसरात होती. परंतु पोलिसांकडून या वृत्तास दुजोरा मिळू शकला नाही. त्यामुळे नेमकी महिला कोण होती? ही घटना खरी की फक्त अफवा होती? याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही.