शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गरीब कुटुंबांना केंद्र सरकारचे गिफ्ट, स्वस्त दरात मिळणार इंडक्शन किंवा सोलर कुकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 06:56 IST

ऊर्जा मंत्रालयाची योजना; लोकसभा निवडणुकांच्या आधी केले जाणार लाभार्थ्यांना वाटप

नवी दिल्ली : ज्यांच्या घरात वीज पोहोचली वा पोहोचणार आहे, अशा ग्रामीण भागांतील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी सरकार सोलर वा इंडक्शन कुकर स्वस्त दरात देणार आहे. ऊर्जा मंत्रालयाची ही योजना आहे. नव्या वर्षात लोकसभा निवडणुकांच्या आधी या कुकरचे वितरण सुरू होईल. ऊर्जा मंत्रालयाच्या ईईएसएल या सरकारी कंपनीकडे वितरणाचे काम सोपवले जाईल.

ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंह यांनी सर्व राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांना प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारने यंदाच्या ३१ डिसेंबरपर्यंत प्रत्येक घरात विजेचे बल्ब पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला गॅस योजनेचा देशभर जोरदार प्रचार घडवून आणला आणि साडेतीन कोटी ग्रामीण कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले. पण पहिला सिलेंडर संपल्यावर दुसरा सिलेंडर घेण्यासाठी पैसेच नसल्याने अनेक कुटुंबांच्या घरात उज्ज्वला योजनेचे रिकामे सिलेंडर पडून आहेत, ही बाब नंतर लक्षात येऊ लागली. त्यानंतर गरीब कुटुंबांना त्यांचे गॅस सिलेंडर बदलावे लागू नयेत यासाठी इंडक्शन किंवा सोलर कुकर पुरवण्याचा पर्याय पुढे आला आहे. यामुळे देशाचा इंधन आयातीवर होणारा खर्चही कमी करता येईल, असे सिंह यांचे मत आहे.खर्चही वाचणारइंडक्शन कुकर व सोलर कुकर वापरण्यास प्रोत्साहन दिल्याने पर्यावरणाचे नुकसान टळेल व देशाचे इंधन आयातीचे बिलही कमी होईल, असे सिंह म्हणाले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली