शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीवर गोळ्या झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देणे चांगले, सपा खासदाराची मुक्ताफळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 14:40 IST

तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली - तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन नाते संपवणे कधीही चांगले, असे वक्तव्य  करत सपाचे खासदार एस.टी. हसन यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. तसेच कुठल्याही धर्माच्या वैयक्तिक बाबीत सरकारने हस्तक्षेप करता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे. ''कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते ज्यामध्ये पती-पत्नीने विभक्त होणे हाच एक मार्ग उरतो. मग अशा परिस्थितीत पत्नीवर गोळी झाडण्यापेक्षा तिला तिहेरी तलाक देणेच योग्य ठरते. तसेच केवळ हजरत अबू हनिफा यांना मानणारे लोकच एकावेळी तीन तलाक देतात. आता अबू हनिफांना मानणाऱ्यांसोबत निकाह करावा का हे मुलीच्या कुटुंबीयांवरच सोडणे योग्य ठरेल.'' असे एसटी हसन यांनी सांगितले.

 मुस्लिम महिलांच्या न्यायासंदर्भात एच. टी. हसन म्हणाले की, इस्लामने महिलांसोबत खूप न्याय केलेला आहे. त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा त्या पतीपासून खुला घेऊ शकतात. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करणे आणि शरियतमध्ये बदल करणे चुकीचे आहे. जर कुठल्याही पुरुषाला तुम्ही तीन तलाक दिले म्हणून तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावत असाल तर तो आपल्या कुटुंबाला पोटगी कशी देऊ शकेल. हे चुकीचे नाही का. हिंदू आणि ख्रिश्चन पुरुषांना एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. मग मुस्लिमांना तीन वर्षांची शिक्षा का, असा सवाल त्यांनी केला.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकSamajwadi Partyसमाजवादी पार्टीParliamentसंसद