शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

कोरोना लसीकरणासाठी केंद्राकडून नवी गाइडलाइन जारी; डोस वाया घालवणाऱ्या राज्यांना बसणार फटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 14:07 IST

केंद्र सरकारनं राष्ट्रीय कोरोना लसीकरण मोहिमेसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत कोरोना लसीकरण होणार आहे.

केंद्र सरकारनं राष्ट्रीय कोरोना लसीकरण मोहिमेसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत कोरोना लसीकरण होणार आहे. यासाठी केंद्राकडून राज्यांना मोफत लस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. पण राज्यांना दिल्या जाणाऱ्या लसीच्या संदर्भात केंद्रानं आता काही गाइडलाइन जारी केल्या आहेत. या गाइडलाइनमध्ये लोकसंख्या, कोरोना रुग्णांचं प्रमाण आणि लसीकरणाची गती या आधारावर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींचं वाटप केलं जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ज्या राज्यांकडून कोरोना लसीचे डोस जास्त वाया घालवले जातील त्याचं निगेटिव्ह मार्किंग केलं जाणार आहे. अशा राज्यांना पुढल्या वेळेस दिल्या जाणाऱ्या लसींचं प्रमाण कमी केलं जाणार आहे. त्यामुळे केंद्राच्या गाइडलाइन्सचं तंतोतंत पालन राज्य सरकारांना करावं लागणार आहे. (govt of india releases revised guidelines for covid vaccination program implemented from june 21)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशात आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी देखील केंद्र सरकार घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. यासाठी पुढील दोन आठवड्यांमध्ये केंद्र आणि राज्यांच्या समन्वयातून तयारी केली जाणार आहे. त्यानंतर २१ जूनपासून देशात लसीकरण मोहीमेला सुरुवात होणार आहे. "२१ जून रोजी योग दिनाचं औचित्य साधून देशात मोफत लसीकरण मोहीम सुरू होईल. यात १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत केलं जाणार आहे. राज्य सरकारांना लसीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही", असं मोदी म्हणाले होते. 

कोरोना संबंधिचे प्रोटोकॉल हेच शस्त्र कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दिसली असली तरी कोरोना गेलेला नाही याचं भान राखायला हवं असं मोदी म्हणाले होते. यात कोरोनाला हरविण्यासाठी आपल्या हातात कोरोना संबंधिचे प्रोटोकॉल पाळणं हेच मुख्य शस्त्र आहे, असंही ते म्हणाले. कोरोना हा अदृश्य स्वरुपातील शत्रू असून त्याला पराभूत करण्यासाठीचं शस्त्र म्हणजे प्रोटोकॉलचं तंतोतंत पालन करणं हेच आहे, असं मोदी म्हणाले.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी