शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा भाजपाचे 'मंत्रिमहोदय' सरकारी कर्मचाऱ्याकडून बूट घालून घेतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 12:51 IST

भाजप मंत्र्यांचा व्हीआयपी कल्चर काही सुटता सुटेना.

नवी दिल्ली -  व्हीआयपी कल्चर सोडून जनतेमध्ये सामील होऊन कामे करावीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याचा  आता भाजपच्याच मंत्र्यांना विसर पडला आहे. उत्तर प्रदेशमधील शाहजहांपुर येथे योगा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी भाजपचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांच्या पायात सरकारी कर्मचारी बूट घालत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी उत्तर देताना चौधरी यांनी स्वता:ची तुलना रामाशी केली.

भाजप मंत्र्यांचा व्हीआयपी कल्चर काही सुटता सुटेना. याच ताज उदाहरण म्हणजे योगी सरकारमध्ये असलेले मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी. योगा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात खाली वाकण्याचे जीवावर आल्याने या मंत्रीमहोदयांनी चक्क सरकारी कर्मचारीकडून आपला बूट पायात घालून घेतले. विशेष म्हणजे हा व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.

चौधरी हे एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांना याप्रकरणी माध्यमांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी स्वता:ची तुलना थेट रामाशी करून टाकली. तर, बूट पायात घालणाऱ्या कर्मचाऱ्याला रामाचा भाऊ भरत यांची उपमा दिली. भाऊ किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती जर आपल्या पायात बूट घालत असेल तर, आमचा हा असा एक देश आहे, जिथे रामाची 'पादत्राणे' राज सिंहासनावर ठेवून त्यांचे भाऊ भरत यांनी १४ वर्ष राज्य केले होते. असे चौधरी म्हणाले.