शहरं
Join us  
Trending Stories
1
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
2
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दिपक केसरकरांची सारवासारव
3
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
4
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
5
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
6
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
7
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
8
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
9
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
10
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
11
Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक
12
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
13
IND W vs SA W: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना ठरणार 'ऐतिहासिक'!
14
PhysicsWallah IPO: पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
15
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
16
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
17
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
18
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
20
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....

अर्थव्यवस्थेवर निर्दयी हल्ला; आरबीआयच्या नफ्यापैकी ९९% रक्कम घेतेय सरकार - सीताराम येचुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 08:14 IST

भारतातील सर्व सीपीआय-एमच्या शाखांनी अर्थव्यवस्था आणि जनतेच्या जीवनमानावर निर्दयी घाला घालण्याच्या या प्रकाराचा संघटितपणे निषेध करावा, असे आवाहनही पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने केले आहे.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारला घसघशीत रक्कम देऊ केल्यावरुन भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. २०१४ पासून सरकार रिझर्व्ह बँकेच्या नफ्यापैकी ९९ टक्के रक्कम घेत आहे, असा आरोप केला.

भारतातील सर्व सीपीआय-एमच्या शाखांनी अर्थव्यवस्था आणि जनतेच्या जीवनमानावर निर्दयी घाला घालण्याच्या या प्रकाराचा संघटितपणे निषेध करावा, असे आवाहनही पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीने केले आहे. मागणीचा अभाव आणि सरकारने आरबीआय लाभाशांतील एवढा मोठा निधी लाटून लादलेल्या आर्थिक बोझ्याने सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न श्रेणीतील अग्रणी कंपन्याचे मोठे नुकसान झाले आहे, असे सीताराम येचुरी यांनी ट्विट केले आहे. 

दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, सरकारचा प्रयत्न वित्तीय सुजाणपणा की, वित्तीय हाराकिरी म्हणावी. अंदाजपत्रकातील आकडेमोडीतील गायब रकमेएवढीच रक्कम बँकेकडून घेण्यात आली आहे, यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

चोरी करून काहीही होणार नाही - राहुल गांधीरिझर्व्ह बँकेचे पैसे चोरी करून काहीही होणार नाही. स्वनिर्मित आर्थिक संकटावर काय उपाय करावा, हे पंतप्रधान आणि वित्तमंत्र्यांना सुचेनासे झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अतिरिक्त शिलकी निधीतून पैसे घेण्याचा प्रकार म्हणजे बंदुकीच्या गोळीने झालेल्या दुर्धर जखमेवर दवाखान्यातून चोरलेली मलमपट्टी करण्यासारखा आहे, अशा परखड शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन सरकारवर निशाणा साधला.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदी