पणजी : नवे मतदारसंघाचे आमदार मिकी पाशेको यांची तुरुंगातील उर्वरित शिक्षा माफ करण्यास राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी नकार दिला आहे. वीज अभियंता मारहाणप्रकरणी सडा येथील तुरुंगात पाशेको शिक्षा भोगत आहेत. आपल्याला माफी मिळावी, अशी विनंती पाशेको यांनी एका याचिकेद्वारे राज्यपाल सिन्हा यांच्याकडे केली होती. राज्य सरकारनेही पाशेको यांना उर्वरित शिक्षा माफ केली जावी, अशी भूमिका घेतली होती. राज्यात विधानसभा अधिवेशन सुरू असताना मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे तशी शिफारस केली होती. तथापि, राज्यपालांनी ती शिफारस मान्य केली नाही. (खास प्रतिनिधी)
पाशेकोंना माफी देण्यास राज्यपालांचा नकार
By admin | Updated: September 9, 2015 00:36 IST