शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल कळसूत्री बाहुली असतात का? राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेतील प्रश्नानं विद्यार्थी चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 17:01 IST

राज्यसेवा आयोगानं केले हात वर

पाटणा: राज्यपाल कळसूत्री बाहुली असतात का, असा प्रश्न बिहारच्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारण्यात आला. त्यामुळे परीक्षेला आलेले विद्यार्थी चकीत झाले. भारताच्या आणि विशेषत: बिहारच्या राजकारणातील राज्यपालांचे स्थान काय? ते केवळ कळसूत्री बाहुली असतात का?, असे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाची बरीच चर्चा झाली. यानंतर राज्यसेवा आयोगानं यामध्ये आपली चूक नसल्याचं स्पष्ट केलं. प्रश्नपत्रिका तयार करणारे शिक्षकच यात दोषी असल्याचं आयोगानं म्हटलं. त्या प्रश्नात कोणतीही चूक नाही. मात्र कळसूत्री बाहुली हा शब्द टाळता आला असता, असं आयोगानं म्हटलं. सध्या बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपाची सत्ता आहे. संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार सरकारचं नेतृत्व करत आहेत. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज्यसभा आयोगाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना राजकीय पक्षांची संख्या आणि निवडणूक याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. जास्त पक्षांनी निवडणूक लढवण्याचे फायदे आणि तोटे सांगा, असा प्रश्न परीक्षेत विचारला गेला. बिहारच्या शालेय परीक्षादेखील कायम वादामुळे चर्चेत राहिल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी आठवीच्या परीक्षेत विचारण्यात आलेला एक प्रश्न अतिशय वादग्रस्त ठरला होता. पाच देशांच्या नागरिकांना काय म्हणालं, असा प्रश्न विचारण्यात आला होता. चीन, नेपाळ, इंग्लंड, भारत आणि काश्मीर अशी नावं त्यापुढे देण्यात आली होती. 

 

टॅग्स :Biharबिहारexamपरीक्षा