शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

राज्यपालांना आणखी मुदत

By admin | Updated: October 31, 2014 01:13 IST

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या सरकारने गेल्या फेब्रुवारीत राजीनामा देताना विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती.

नवी दिल्ली : गेले पाच महिने विधानसभा निलंबनावस्थेत असलेल्या दिल्लीत सरकार स्थापन करण्याची शक्यता आजमावून पाहण्यासाठी नायब राज्यपालांनी सर्व राजकीय पक्षांशी सल्लामसलत सुरु करणो हा सकारात्मक हालचालींचा संकेत आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने यातून काही निष्पन्न होते का हे पाहण्यासाठी येत्या 11  नोव्हेंबर्पयत प्रतिक्षा करण्याचे बुधवारी ठरविले.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या सरकारने गेल्या फेब्रुवारीत राजीनामा देताना विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती. मात्र ती मान्य न करता विधानसभा प्रलंबित ठेवली गेली. याला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांनी केली असून न्यायालयाने दिल्लीत नव्याने निवडणूक घेण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे. सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे या याचिकेवर सुनावणी सुरु आहे.
गुरुवारी सुनावणी झाली तेव्हा वृत्तपत्रंमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संदर्भ देत सरन्यायाधीश म्हणाले की, सरकार स्थापनेची शक्यता आजमावण्यासाठी नायब राज्यपाल राजकीय पक्षांशी सल्ला मसलत करणार ही सकारात्मक बाब आहे.
 यातून काय निष्पन्न होते ते पाहू अन्यथा 11 नोव्हेंबर रोजी याचिकेची गुणवत्तेवर सुनावणी सुरु केली जाईल, असेही न्यायालयाने सूचित केले.
बहुमताचा पाठिंबा नसलेल्या पक्षाने अन्य कोणाचा तरी बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणो, असेही ठराविक परिस्थितीत घडू शकते, याकडेही न्यायमूर्तीनी लक्ष वेधले. यावर याचिकाकत्र्याचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण म्हणाले की, असे करणो म्हणजे दिल्लीच्या नागरिकांना प्रातिनिधिक सरकारचा हक्क नाकारण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यासारखे होईल. मात्र नायब राज्यपाल सरसार स्थापनेच्या दृष्टीने पुन्हा प्रयत्न करून पाहणार असतील तर त्यास आपली हरकत नाही. पण यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी, असे ते म्हणाले.
न्यायालयाचे असेही म्हणणो होते की, राज्यपालांची शिष्टाई यशस्वी झाली नाही व सरकार स्थापनेस यश आले नाही तर ते कदाचित राष्ट्रपतींचा सल्लाही घेऊ शकतात. हे सर्व करायला त्यांना उचित कालावधी द्यायला हवा.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4नायब राज्यपाल आहे त्या विधानसभेतच सरकार स्थापण्याचे पर्याय  आजमावून पाहत असले तरी अगदीच अपरिहार्य झाले तर नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय केंद्र सरकार तीन जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल 23 डिसेंबर रोजी लागल्यानंतरच घेईल, असे कळते.
 
4या तिन्ही जागा भारतीय जनता पार्टीकडे होत्या व पोटनिवडणुकांमध्ये त्या पुन्हा जिंकण्याची पक्षास खात्री आहे. तसे झाले तर भाजपाची सदस्यसंख्या 29 वरून 32 म्हणजे स्पष्ट बहुमताहून फक्त चारनेच कमी होईल.