शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राजभवनसमोरील निदर्शनांची गंभीर दखल, राज्यपालांनी मागविला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 06:10 IST

पश्चिम बंगाल : कुठे आहे कायदा-सुव्यवस्था-ट्विटरवर विचारला सवाल

कोलकाता : राजभवनसमोर नियम मोडून सलग दोन दिवस सुरू असलेल्या निदर्शनांची गंभीर दखल पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी घेतली असून, याबाबत कोलकाता पोलिसांकडून अहवाल मागविला आहे.

राज्यपालांनी ट्विटरवर आपले म्हणणे मांडले असून, दोन्ही घटनांच्या व्हिडिओ क्लिप जारी करताना कोलकाता पोलिसांच्या अधिकृत हॅन्डलला टॅग केले आहे. नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणात दोन मंत्र्यांसह सत्तारूढ तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर सोमवारी राजभवनच्या चारही प्रवेशद्वारांसमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी एका सामाजिक संघटनेने निदर्शने केली. यात एकाने उत्तर दारासमोर काही पाळीव प्राणी घेऊन निदर्शने केली.

राज्यातील कायदा-व्यवस्था बिघडल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित करणारे धनखड यांनी आंदोलनकर्त्यांनी धमकीसारखे हावभाव करणे, कायद्याबाबत असन्मान दाखविणे व पोलिसांनी त्याची दखल न घेणे, याबाबत आक्षेप घेतला आहे.मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व कोलकाता पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलला टॅग करीत राज्यपालांनी म्हटले आहे की, ही आहे कायदा-व्यवस्थेची दुरवस्था. राजभवनच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही चिंताजनक स्थिती आहे आणि हे सर्व कलम १४४ लागू असताना होत आहे. याचा अहवाल मागण्यासाठी मी बाध्य आहे. अन्य एका ट्विटमध्ये राज्यपालांनी राजभवनबाहेर पाळीव प्राण्यांसमवेत उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

नारदा प्रकरणी सुनावणी उच्च न्यायालयात हलविण्याची सीबीआयची मागणीनारदा स्टिंग प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयाकडे हलविण्याची मागणी करणारी याचिका सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत सीबीआयने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कायदेमंत्री मलय घातक यांना प्रतिवादी केले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. राजेश बिंदल यांच्या खंडपीठापुढे सीबीआयची याचिका सादर करण्यात आली. याशिवाय मंत्री सुब्रत मुखर्जी, फिरहाद हाकिम, आमदार मदन मित्रा तसेच माजी महापौर शोभन चॅटर्जी यांनी उच्च न्यायालयाने सीबीआय विशेष न्यायालयाने दिलेल्या जामिनास स्थग‍िती मागे घेण्याची याचिका दाखल केली होती. दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल