शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम नबी आझाद यांच्यासाठी सरकारचे ‘रेड कार्पेट’; कार्यक्रमस्थळी आझाद यांचे पाेस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 00:07 IST

कार्यक्रमस्थळी आझाद यांचे पाेस्टर्स, काँग्रेस नेत्याची भाजपसाेबत जवळीक वाढली

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची भारतीय जनता पार्टीसाेबत जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे आयाेजित एका भव्य  ‘मुशायरा’मध्ये आझाद यांच्यासाठी माेदी सरकारने रेड कार्पेट अंथरले. याशिवाय आझाद यांचे छायाचित्र असलेले बॅनर्स आणि पाेस्टर्सही कार्यक्रमस्थळी लावण्यात आले हाेते. माेदी सरकारने आयाेजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्याचे पाेस्टर्स दिल्लीमध्ये प्रथमच झळकले आहेत. 

गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ नुकताच संपला. मावळत्या सदस्यांना निराेप देताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुलाम नबी आझाद यांची ताेंडभरून स्तुती केली हाेती. त्यांच्याबाबत बाेलताना माेदींचे डाेळेही पाणावले हाेते. माेदींकडून आझाद यांची स्तुती ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले हाेते. त्यानंतर आता भाजपने त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरून जंगी स्वागत केले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि जितेंद्र सिंग यांनी आझाद यांचे स्वागत केले. सिंग आणि आझाद हे दाेघेही मूळचे जम्मू आणि काश्मीरचे आहेत. 

आझाद साईडलाईन झाल्याचे चित्र

कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविले नाही. तसेच त्यांना इतरही महत्त्वाची जबाबदारीही दिलेली नाही. एकेकाळी काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या ते अतिशय जवळचे हाेते. अलीकडच्या काळात ते साईडलाईन झालेले दिसून आले. ‘मुशायरा’ कार्यक्रमात आझाद यांना देण्यात आलेले महत्त्व आणि आदरातिथ्यामुळे ते भाजपच्या जवळ जात असल्याचे बाेलले जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस