शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

असहिष्णुतेवरून सरकारची अग्निपरीक्षा

By admin | Updated: November 25, 2015 00:14 IST

असहिष्णुतेपासून तर वाढत्या महगाईपर्यंतच्या अनेक मुद्यांवरून सरकारला घेरण्यासाठी समस्त विरोधी पक्ष एकजूट झाल्यामुळे येत्या २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत

नवी दिल्ली : असहिष्णुतेपासून तर वाढत्या महगाईपर्यंतच्या अनेक मुद्यांवरून सरकारला घेरण्यासाठी समस्त विरोधी पक्ष एकजूट झाल्यामुळे येत्या २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.विरोधी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सरकारला विविध मुद्यांवरून लक्ष्य बनविण्याबाबत विचारविमर्श झाला. विशेषत: संयुक्त जनता दल असहिष्णुता आणि पुरस्कार वापसीचा मुद्दा संपूर्ण ताकदीनिशी उपस्थित करण्याच्या तयारीत आहे. ‘आता आसामच्या राज्यपालांनी संवैधानिक पदावर असतानाही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावरून सरकारने बिहारमधील पराभवापासून कोणताही धडा घेतला नसल्याचे दिसते. आम्ही लव जिहादपासून तर घर वापसी आणि दादरी हत्याकांड व वाढत्या असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करू,’ असे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.देशात आरक्षण धोरणाची योग्यरीत्या अंमलबजावणी केली जात नाही, असा आरोप करून संसद अधिवेशनात आरक्षण धोरणाचा मुद्दाही उपस्थित करणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले. याशिवाय संयुक्त जनता दलातर्फे डाळ, खाद्यतेल आणि पालेभाज्यांच्या भाववाढीचा मुद्दाही नियम २६७ अन्वये उपस्थित केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.२६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यासाठी आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी पहिले दोन दिवस संसदेची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान वस्तू आणि सेवाकर विधेयकासह (जीएसटी) अन्य महत्त्वाची सुधारणा विधेयके पारित करण्यात काँग्रेसचा पाठिंबा मिळेल, अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे डावपेच ठरविण्यासाठी मंगळवारी वरिष्ठ मंत्र्यांनी विचारविमर्श केला.