शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे आंदोलकांत फूट पाडण्याचे प्रयत्न, विरोधकांनीही उघडली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 07:52 IST

Farmer News : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या मदतीने शेतकऱ्यांना वेगवेगळे बोलावून त्यांना आंदोलनातून दूर करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजल्यावर त्यांचे हे प्रयत्न उधळून लावण्यासाठी विरोधी पक्षांनीही आपले प्रयत्न सुरू केले आहेत.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न करीत असलेल्या सरकारच्या रणनीतीला उधळून लावण्यासाठी विरोधी पक्षांनीही नवी व्यूहरचना आखण्यासाठी आपापसांत चर्चा सुरू केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि हरयाणाचे  मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या मदतीने शेतकऱ्यांना वेगवेगळे बोलावून त्यांना आंदोलनातून दूर करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजल्यावर त्यांचे हे प्रयत्न उधळून लावण्यासाठी विरोधी पक्षांनीही आपले प्रयत्न सुरू केले आहेत.उच्चपदस्थ सूत्रांनुसार याचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या येथील सरकारी निवासस्थानी नेते एकत्र येत आहेत. या बैठकीला ज्या नेत्यांनी उपस्थित राहण्याची तयारी दाखविली त्यात राहुल गांधी, सीताराम येचुरी, डी. राजा, कानिमोझी यांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दलासह दुसरे पक्षही या बैठकीत भाग घेऊ शकतील. बुधवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली जाणार असून, त्यांना दिले जाणारे निवेदन तयार केले जाईल. एकीकडे काँग्रेस विरोधी पक्षांसोबत रणनीती बनवीत आहे. तर दुसरीकडे पक्षाने भूपेंद्र हुड्डा, सुनील जाखड यांच्यासह शेतकऱ्यांशी संपर्क असलेल्या नेत्यांनाही मैदानात उतरविले आहे. हे नेते त्यांच्याशी बोलून हे ठरवतील की, सरकारशी कोणत्याही भेटीत जोपर्यंत सरकार तिन्ही शेतकरीविरोधी कायदे परत घेणार नाही तोपर्यंत तडजोड करायची नाही. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “तिन्ही कायद्यांत सुधारणांना कोणतीही जागा नाही. सरकार ज्या सुधारणांच्या गोष्टी करते त्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलवावे आणि चर्चा करावी. त्या आधी तिन्ही कायदे परत घ्यावे लागतील.”  आंदोलनास अमेरिकेत लोकप्रतिनिधींचा पाठिंबावॉशिंग्टन : भारतात नव्या कृती कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना अमेरिकेतील अनेक लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देऊन त्यांना शांतपणे निदर्शने करू द्यावीत, असे आवाहन केलेे. विदेशी नेत्यांनी दिलेला हा पाठिंबा आणि आवाहन हे ‘चुकीच्या माहितीवर’ आणि ‘अनावश्यक’ असल्याचे आणि लोकशाही असलेल्या देशातील हा विषय अंतर्गत आहे, असे भारताने म्हटले. काँग्रेसचे डौ लामाल्फा सोमवारी म्हणाले की, “भारतातील पंजाबी शेतकरी उपजीविकेसाठी लढत असून सरकारचे दिशाभूल करणारे नियम, हातचलाख्या यांच्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीPunjabपंजाब