शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'अच्छे दिन' विसरा; कायम राहणार महागाईची धार, अबकारी शुल्क 'जैसे थे' ठेवणार मोदी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 11:55 IST

इंधनावरील अबकारी शुल्कात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.

बहुत हुई महँगाई की मार, अबकी बार मोदी सरकार, अशी जाहिरात मागील लोकसभा निवडणुकीवेळी भाजपकडून करण्यात आली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतीदेखील कमी झाल्या होत्या. मात्र याचा कोणताही फायदा सर्वसामान्यांना झाला नाही. आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. यासोबतच इंधनावरील अबकारी शुल्कात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे देशवासीयांना उन्हाच्या झळांसोबतच इंधन दरवाढीचे चटकेही सहन करावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढल्याने डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. तर पेट्रोलच्या दरानेही चार वर्षातील उच्चांक गाठला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यावर आंतराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती घसरल्या होत्या. त्यामुळे महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2016 या कालावधीत अबकारी शुल्कात नऊवेळा वाढ केली होती. मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इंधनाचे दर प्रति लीटर दोन रुपयांनी कमी करण्यात आले होते. इंधनाच्या किमती भडकल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा अबकारी शुल्कात कपात करुन सरकार सर्वसामान्यांना दिलासा देणार का, असा प्रश्न अर्थ सचिव हसमुख अढिया यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, सरकारचा असा कोणताही विचार नसल्याचे अढिया यांनी स्पष्ट केले. 'सध्या अबकारी शुल्कात कपात करण्याचा सरकारचा विचार नाही. ज्यावेळी इंधन दरांमध्ये बदल केले जातील, तेव्हा त्याबद्दलची माहिती सरकारकडून दिली जाईल,' असे अढिया यांनी म्हटले. याआधी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन तेलाच्या किमतीवर सरकारचे लक्ष असल्याचे म्हटले होते. देशातील इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरांप्रमाणेच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. पेट्रोल आणि डिझेल जितक्या लवकर जीएसटीच्या कक्षेत येतील, तितक्या लवकर ग्राहकांना त्याचा फायदा होईल, याचाही प्रधान यांनी पुनरुच्चार केला.  

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलNarendra Modiनरेंद्र मोदी