शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

परदेशांतील भारतीय लोकप्रतिनिधींना बनविणार सदिच्छादूत, सरकारची योजना; ९ जानेवारीला संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:20 IST

भारतीय परराष्ट्र धोरणाची मुद्रा जगात प्रभावीपणे उमटावी यासाठी मोदी सरकार आगळीवेगळी योजना राबविण्याच्या विचारात आहे. अन्य देशांतील भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींना भारताचे अघोषित राजदूत म्हणजे सदिच्छादूत बनविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - भारतीय परराष्ट्र धोरणाची मुद्रा जगात प्रभावीपणे उमटावी यासाठी मोदी सरकार आगळीवेगळी योजना राबविण्याच्या विचारात आहे. अन्य देशांतील भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींना भारताचे अघोषित राजदूत म्हणजे सदिच्छादूत बनविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.मूळ भारतीय वंशाचे वा पूर्वी भारतीय नागरिक असलेल्यांपैकी जे आता विविध देशांत लोकप्रतिनिधी आहेत, त्यापैकी निवडक लोकप्रतिनिधींचे एक संमेलन दिल्लीमध्ये ९ जानेवारी रोजी मोदी सरकारने आयोजित केले आहे. या संमेलनात २२ देशांतील १२४ लोकप्रतिनिधी तसेच १५ महापौर सहभागी होणार आहेत. अमेरिकेतील दोन महापौरही याप्रसंगी उपस्थित राहाणार आहेत. मात्र अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींनी या संमेलनात सहभागी होण्याबाबत आपला होकार अद्याप कळविलेला नाही. अमेरिकन सिनेटमध्ये सुरु असलेल्या कामकाजामुळे त्यांना संमेलनाला येणे शक्य होणार नाही असे सांगितले जात आहे. या लोकप्रतिनिधींद्वारे भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत त्या त्या देशांमध्ये सकारात्मक वातावरण तयार करणे शक्य होईल, असे मोदी सरकारला वाटत आहे. देशोदेशांतील भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी आपल्या मातृभूमीविषयी मनात ममत्व बाळगून असतात. नेमका याच गोष्टीचा उपयोग मोदी सरकारला करुन घ्यायचा आहे.पाकचा कोणीच नाहीइंग्लंडमधून १५, न्यूझीलंडमधून ३, कॅनडातून ५ लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. गियानातून २०, स्वित्झर्लंडमधून १, मॉरिशसमधून ११, सूरिनाममधून ९ लोकप्रतिनिधी संमेलनाला येत आहेत. केनिया, फिलापाइन्स, पोर्तुगाल, टांझानिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतूनही भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी संमेलनास उपस्थित असतील. सार्क देशांमधून फक्त श्रीलंकेतून मूळ भारतीय वंशाचे चार लोकप्रतिनिधी येणार आहेत. पाकिस्तान व बांगलादेशातून मात्र या संमेलनास कोणीही उपस्थित राहाणार नाही. 

टॅग्स :Indiaभारत