शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्ताची मदत करणा-यास दिल्ली सरकारकडून दोन हजार रूपयांचं बक्षिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 06:43 IST

'चांगलं काम' करणा-या व्यक्तींसाठी नवी योजना, या योजनेनुसार 'चांगलं काम' करणा-यास दोन हजार रूपयांचं बक्षिस

नवी दिल्ली - अपघातग्रस्तांची मदत करणा-या व्यक्तींसाठी दिल्ली सरकार लवकरच एक नवी योजना सुरू करणार आहे. या योजनेनुसार मदत करणा-या व्यक्तीस दोन हजार रूपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे. या योजनेला दिल्ली सरकारने जानेवारी महिन्यात मंजुरी दिली होती. लवकरच ही योजना अंमलात येणार आहे. इतरांची मदत करण्यास, चांगलं काम करण्यास लोकांना प्रोत्साहन मिळावं हा या योजनेमागचा उद्देश असल्याचं दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं. बिजनेस स्टॅन्डर्डने याबाबत वृत्त दिलं आहे. काय असेल चांगलं काम -रस्त्याने कुठे जाताना तुम्हाला कोणाचा अपघात झाल्याचं दिसल्यास त्या जखमीला शक्य तेवढ्या लवकर जवळच्या सरकारी अथवा खासगी कोणत्याही रूग्णालयात भरती करावं. जखमीची योग्य वेळेस मदत करून त्याला रूग्णालयात पोहोचवणा-यास दोन हजार रूपयांचं बक्षिस देण्यात येईल, असं जैन म्हणाले. जखमीच्या उपचाराचा खर्चही दिल्ली सरकारच करेल असंही जैन यांनी सांगितलं. ही योजना कशासाठी -गेल्या वर्षी दिल्लीच्या सुभाष नगरमध्ये अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा कोणीही मदत न केल्याने उपचाराअभावी दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अशाप्रकारची योजना सुरू करण्याचा विचार दिल्लीच्या केजरीवाल सरकारने केला होता. इतरांना मदत करणा-यांना या योजनेमुळे प्रोत्साहन मिळेल असा विश्वास जैन यांनी यावेळी व्यक्त केला.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNew Delhiनवी दिल्ली