शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शत्रू मालमत्ता कायद्यातून सरकार मिळवणार तीन हजार कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 05:38 IST

जे लोक फाळणीनंतर भारत सोडून गेले, त्यांची मालमत्ता विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या विकल्यास सुमारे ३ हजार कोटी रुपये मिळू शकतील, असा अंदाज आहे.

नवी दिल्ली : जे लोक फाळणीनंतर भारत सोडून गेले, त्यांची मालमत्ता विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या विकल्यास सुमारे ३ हजार कोटी रुपये मिळू शकतील, असा अंदाज आहे. कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली.फाळणीनंतर पाकिस्तानात अथवा ५0 वर्षांपूर्वी चीनला स्थलांतर केलेल्या लोकांच्या मालमत्तांबाबतच्या शत्रू संपत्ती कायद्यात (एनिमी प्रॉपर्टी अ‍ॅक्ट-१९६८) मध्ये केंद्र सरकारने सुधारणा केली होती. मात्र ते विधेयक संसदेत संमत न झाल्याने त्याचा वटहुकूम केंद्र सरकारने काढला होता. त्याची आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कायद्यान्वये भारत सोडून पाकिस्तान वा चीनला गेलेल्या या मंडळींना त्यांच्या येथील मालमत्तांवर अधिकार सांगता येत नाही. या सर्व मालमत्ता आता विकण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे.लखनऊच्या राजाची सर्वाधिक मालमत्तालखनऊमधील राजा महमूदाबाद यांच्याकडे सर्वाधिक मालमत्ता होती. केंद्र सरकार प्रत्यक्षात या कायद्यान्वये त्या मंडळींचे विविध कंपन्यांमधील शेअर्स विकणार आहे. सध्या सुमारे २० हजार शेअरधारकांचे ९९६ कंपन्यांमधील ६.५ कोटी शेअर्स एनिमी प्रॉपर्टी आॅफ इंडियाच्या कस्टोडियन कार्यालयाकडे आहेत. ५८८ कंपन्या आजही सक्रिय आहेत. म्हणजेच सध्या अस्तित्वात व सक्रिय असलेल्या कंपन्यांमधील या मंडळींचे शेअर्स सरकार विकणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार